shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.सौ.वंदनाताई मुरकूटे आणि सुदाम पटारे यांनी तहसिलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन..!

भोकर । प्रतिनिधी:-
शासनाच्या विविध योजनामधील अडचणी,अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, गौणखनिज उपलब्धता करून द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच पंचायत समीतीच्या माजी सभापती डॉ.सौ.वंदनाताई मुरकूटे व काँग्रेस सेवा दल चे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे यांचे मार्गदर्शनाखाली नुकतेच श्रीरामपूर तहसिलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरागांधी योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थ सहाय्य योजना या संदर्भातील कागदपत्रांची पुर्तता करताना तहसिल कार्यालयाकडून पुर्नविवाह न केल्याचा दाखला मागीतला जातो परंतू सदरील दाखला मिळविणेकामी गोरगरीेब विधवा महिलांना अडचणी येतात. 

तसेच सोयाबीन, कांदा, कपाशी यांचे भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत असल्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान भरपाई मिळणेकामी शासनस्तरावर कार्यवाही व्हावी. गौण खनिज उपलब्ध नसल्यामुळे कष्टकरी मजूरांना रोजंदारी नाही त्यामुळे हे गौणखनिज उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधारच्या नायब तहसिलदार चारूशिला मगरे या उपस्थित होत्या.

या निवेदनावर पंचायत समीतीच्या माजी सभापती डॉ.सौ.वंदनाताई मुरकूटे, काँग्रेस सेवा दल चे तालुकाध्यक्ष सुदामराव पटारे, भोकर सोसायटीचे माजी अध्यक्ष दिलीप पटारे, रामदास ढोकणे, शकुंतला आहेर, लहानबाई रननौरे, सुनिता आहेर, मारूती आहेर, सचीन रननौरे, सुधाकर शेळके व रेखा शेळके आदिंच्या सह्या आहेत.

close