shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुस्लिम समाज फ्रेंड सर्कल ग्रुपच्यावतीने पिंपळगाव बसवंत नवनिर्वाचित सरपंच पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..!

मानव सुरक्षा सेवा संघ नेहमी चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा - प्रदेशाध्यक्ष ॲड.बशीरभाई भुरे

शौकतभाई शेख (वि.प्र.) श्रीरामपूर
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे निरनिर्वचीत सरपंच भास्करराव बनकर,उपसरपंच मोरे व नाना बनकर पॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी येथील वॉर्ड क्रमांक पाच,इस्लामपुरा मुस्लिम समाज फ्रेंड सर्कल ग्रुप (तौसीफभाई मन्सूरी, फईमभाई शेख, जमीरभाई शेख आदि) पदाधिकाऱ्यांच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे  म्हणाले की,मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांच्या आदेशान्वये,राज्यासह परराज्यातही मानव सुरक्षा सेवा संघाचे कार्य मोठ्या जोमाने चालु आहे,सामाजातील रांजल्या,गांजल्या तथा उपेक्षित आणि दुर्लक्षितांसोबतच जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नाप्रसंगी सेवा संघ प्रखडतेने आपली भुमिका पार पाडत आहे.

नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच पदाधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरी समस्यांप्रश्नी अधिक लक्ष असावे तसेच उपस्थित आणि दुर्लक्षितांसोबत
 पिडीत व त्रस्त जनतेला न्याय देण्याचे प्रयत्न व्हावेत,पंतप्रधान योजनेनुसार प्रत्येक घरी पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात यावे, दिवा बत्ती रस्ते, पाणी, व तुंबलेल्या गटारी अशा विविध नागरी समस्यांप्रश्नी नवनिर्वाचित सरपंच महोदय आणि पदाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घालावे अशी समस्त जनतेची अपेक्षा आहे,त्या अपेक्षा नवनिर्वाचित सरपंच आणि पदाधिकाऱ्यांकडून नक्कीच पुर्ण होतील अशी अपेक्षा बाळगतो.

पिंपळगाव बसवंतच्या समस्त जनतेला न्याय देवून पिंपळगाव बसवंत नगरीचे नंदनवन करावे,गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्थरावरील योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी मानव सुरक्षा सेवा संघ नेहमी आपल्या सोबत आहे, नेहमी चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठिशी आमचा संघ नेहमी खंबीरपणाने उभा राहतो असेही प्रदेशाध्यक्ष ॲड.बशीरभाई भुरे शेवटी म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच भास्करराव बनकर म्हणाले की आमचे खंबीर नेतृत्व आणि जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून सोपवलेली जबाबदारी निश्चितच इमाने- ऐतबारे निभावण्याचा प्रयत्न केला जाईल,नागरी समस्यांप्रश्नी न भूतो ना भविष्य अशी खबरदारी घेतली जाईल असेही ते म्हणाले.

तसेच यावेळी उपसरपंच बाळा सुदाम मोरे म्हणाले की,गावाचा अधिकाधिक विकास व्हावा म्हणून शासन स्थरावर जलद गतीने प्रयत्न करुन केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील,गांव सुजलाम, सुपलाम होवून नागरी  लवकरात लवकर नागरी समस्या मुक्त कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल असेही ते म्हणाले.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच भास्कर नामदेव बनकर, उपसरपंच बाळा सुदाम मोरे, ग्रामपंचायत सदस्या छायाताई, राजेश पाटील, विनायक चंद्रकांत खोडे, केशव भास्कर बनकर, सोनाली हर्षल जाधव, अमोल विलास बागूल, दत्तू शिवाजी मोरे, रेखाताई किरण लबडे, हिराबाई अशोक दळवी, प्रतिभा रामराव बनकर, दशरथ पंढरीनाथ मोरे, सपना अशीश बागूल,यांच्या समवेत येथील वॉर्ड क्रमांक पाच, इस्लामपुरा मुस्लिम समाज फ्रेंड सर्कल ग्रुप चे तौसीफभाई मन्सूरी,फईमभाई शेख,जमीरभाई शेख आणि ग्रुपचे पदाधिकारी आदि यांच्या समवेत हजारोच्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

close