shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रह्माकुमारी आळेफाटा सेंटरवर महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..!

आळे:- दिनांक 21 जानेवारी :- ब्रह्माकुमारी आळेफाटा सेंटरवर महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला .आळेफाटा व परिसरातील अनेक स्त्रियांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी डॉ.हांडे मॅडम, एड. वर्षा टिंगरे समाजसेविका वैशालीताई देवकर व सुंदरताई कुऱ्हाडे  तसेच इतर मान्यवर उपस्थित होते त्यांचे सेंटरच्या प्रमुख संचालिका ब्रह्माकुमारी शीतल दीदींनी स्वागत केले व दीदींनी महिलांना महिला सशक्तीकरणासाठी अध्यात्माचे महत्त्व सांगितले राजयोगाचा अभ्यास देखील करून घेतला व शिव परमात्माला कायम सोबत आठवणीत ठेवले तर तो निश्चित मदत करतो ,म्हणून आजच्या धावत्या काळात रोज दहा मिनिटे तरी राजयोगाचा अभ्यास करावा असा मोलाचा संदेश दिला.
close