shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी घेतले शनि दर्शन..!

 नेवासा । प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी काल शनिवारी शनि अमावस्येच्या निमित्त श्री शनि दर्शन घेतले. यावेळी विधिवत अभिषेक केला.त्यानंतर स्वयंभू शनि मूर्तीस तेल अर्पण करीत दर्शन घेतले यावेळी त्यांनी शनी दर्शनाचा लाभ घेत प्रार्थना केली.यावेळी  युवानेते उदयन गडाख यांनी त्यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला.

यावेळी अहमदनगर,श्रीरामपूर विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे, सुनील पाटील, सावन पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक अतुल गावडे, विकास लोहकरे, सुरेश उबाळे, हनुमान पारधी, मंगेश बर्डे वाहन चालक गणेश गांगुर्डे, देवराम गीते यांच्यासह महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर, ड्रायव्हिंग स्कूल संचालक विनायक घनवट आदि उपस्थित होते.

 शनि अमावस्या मुळे श्री शनी दर्शनासाठी भाविकांच्या होणाऱ्या मोठ्या वर्दळीनिमित्त जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

close