shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भव्य योगा क्लासच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केज येथे दिमाखात संपन्न!!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज शहरातील विजय स्पोर्टस् अकॅडमी संचलित योगा क्लासेसचे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला .या कार्यक्रमाचे उद्घाटन अंकुशराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक राहुल देशमुख हे होते. 


तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ वासुदेव नेहरकर, नगसेवक सोमनाथ गुंड, दिलीपराव गुळभिले , अशोक मस्के , संजय गुंड , नेहरकर सर , ठोंबरे सर , बोरडे सर पत्रकार भांगे सर , तळेकर सर तोंडसे सर , मुंडे सर होते .कार्यक्रमाच्या सुरुवातील ओम प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार संभारभाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर योग शिक्षीका जयश्री गुंड यांनी योगाचे  विद्यार्थ्यासमवेत प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रिडा संयोजक विनोद गुंड यानी केले तसेच डॉ. नेहरकर , अंकुशराव इंगळे ,मस्के सर यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप राहुल देशमुख यांनी केला . 

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरी सर यांनी केले .तर आभार ठोबरे सर यांनी मानले. सदरील कार्यक्रम विद्याधन बालविद्यालयामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमास कोरडे मॅडम , बोरडे मॅडम , घुले मॅडम , डोईफोडे मॅडम यावेळी अनेक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close