प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील ढाकेफळ ग्राम पंचायत मधे नव्याने निवडून आलेल्या सरपंच रतन अंधारे , सदस्य अरविंद थोरात व इतरानी आपल्या वरील जबाबदारीची जाणीव ठेवून कामाला सुरूवात केली असून ग्राम स्वच्छता सगळ्यांनी मिळून करायची ठरवली व पदभार स्विकारताच कामाला लागले .
तरुणाई व अनुभवी एकत्र येऊन ढाकेफळ ग्राम पंचायत निवडणूक जिंकून आल्यावर आपल्या कामाची सुरूवात करायची तर ती गावच्या विकासासाठी व गावातील नागरिकांना चांगले आरोग्य देण्यासाठी सुरूवात करायची असे ठरवले व गावच्या स्वच्छता पासूनच सुरुवात केली आहे. यावेळी आपले गाव स्वच्छ गाव या संकल्पनातुन गावचा विकास करायचा निर्धार केला.
यावेळी सरपंच रतन अंधारे उपसरपंच गोपाळ थोरात चेअरमन राजपाल (अण्णा) थोरात, युवा नेते अरविंद थोरात, महादेव थोरात, बालासाहेब चटप, शुभम अंधारे, बळीदादा थोरात, पांडुरंग थोरात, सिताराम थोरात, दादा थोरात, लक्ष्मण थोरात, सुभाष अंधारे, भैरवनाथ थोरात, सिद्धेश्वर थोरात, बालु थोरात, गणेश थोरात, पांडुदादा, संपत पंडीत, विनोद थोरात, दीपक थोरात, बजरंग थोरात, पिल्लू थोरात, सुमित अंधारे, व ग्रामपंचायत कर्मचारी रवी घाडगे व नामदेव पवार सह ढाकेफळ ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

