प्रतिनिधी : संजय वायकर
सोलापूर : 9 / वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे, वाचन माणसाला परिपूर्ण व स्वयंपूर्ण बनविते. वक्तृत्व शैली जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे मत रोहन पाटील यांनी व्यक्त केले.
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात, भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व वालचंद शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भाऊसाहेब गांधी' यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी रोहन पाटील बोलत होते. संस्थेचे खजिनदार भूषण भाई शहा हे अध्यक्षस्थानी होते.विश्वस्त पृथ्वीराजभाई गांधी, परागभाई शहा, प्रतिष्ठानचे सचिव प्रदीप पंडित यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत राज्यातील 14 जिल्ह्यातून सुमारे 170 पेक्षाही अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून प्रा.डाॅ.केदारनाथ काळवणी, प्रा.डॉ.सतीश काशीद आणि अरुणकुमार धुमाळ यांनी काम पाहिले. प्रसाद लोखंडे (प्रथम),साईनाथ महादवाड (द्वितीय),शुभम् निकम (तृतीय),अनुष्का बिराजदार, काकासाहेब पोपळे,आणि रोहन चव्हाण (उत्तेजनार्थ) यांना, विश्वस्त परागभाई शहा यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक समारंभासाठी प्राचार्य डॉ.अश्विन बोंदार्डे, प्राचार्य डाॅ.सत्यजित शहा,व प्रदीप पंडित उपस्थित होते. उद्घाटन सत्राची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.प्रा.डाॅ.मनोहर जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन, प्रा.डाॅ.ज्योती वाघमारे तर दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.अजित देवसाळे यांनी केले. स्पर्धा संयोजक प्रा.डाॅ.दत्ता वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी, संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य डाॅ. संतोष कोटी, विविध शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

