shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी बाबासाहेब घाडगे सर यांची बिनविरोध निवड

इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी  बाबासाहेब घाडगे सर यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी:ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन आनंद लुटावा. एकमेकांच्या सुख दुःखात सामावून मनावरचा बोजा कमी व्हावा, ज्येष्ठांच्या काही अडचणी असल्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मार्ग काढावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या शासकीय सवलती आहेत. त्या मिळवण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात यावा इत्यादी विविध उद्देशाने काढण्यात आलेल्या या जेष्ठ नागरिक संघटना इंदापूर च्या
 दि. ९ जानेवारी २०२२ रोजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी  बाबासाहेब घाडगे तर
उपाध्यक्ष पदी  भानुदास पवार  व सौ छाया जाधव संघाच्या सचिव पदी  हनुमंत शिंदे ,सहसचिव पदी प्रमोद भंडारी खजिनदार पदी का.नी. जगताप यांची सर्वानुमते निवड झाली.
यावेळी नूतन संचालक सभेस हजर होते.
नंदकुमार गुजर ,पांडुरंग जगताप, बबन क्षीरसागर ,सिकंदर इनामदार ,श्रीमती सुनिता देशपांडे, सौ जयश्री पोतदार, अंकुश ढुके ,अशोक गानबोटे चित्तरंजन पाटील आबा ,जव्हार बोरा ,राजाराम गलांडे, महादेव चव्हाण सर ,प्रकाश अडसूळ,  दत्तात्रेय चांदणे, निवृत्ती शिंदे, सभेच्या शेवटी सचिवांनी आभार मानले सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली.
close