*साप्ताहिक प्रतिनिधी ते संपादक वाटचाल करणारा संघर्षशील पञकार
शौकतभाई शेख - श्रीरामपूर
आपल्या समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून शिर्डी शहरात मितभाषी तथा मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे पत्रकार राजेंद्र बनकर यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला,त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छाही दिल्या.
श्री.बनकर यांची पत्रकारीता ही सामाजाभिमुख जरी असली तरी तितकीच सडेतोड देखील आहे,
प्रिंट मिडिया असो की, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वत्र बातम्यांच्या बाबतीत त्यांची कार्यतत्परता आणि कार्यक्षमता जरासी हटके असे म्हटल्यास वावगे ठरु नये अशी आहे.जगाला सर्व धर्म समभाव आणि श्रद्धा व सबूरीचा मुलमंत्र देणारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे महान संत जगदगूरु श्री साईबाबाजींच्या श्रीक्षेत्र शिर्डी शहरातून साधारणतः २००१ मध्ये राजेंद्र बनकर यांना प्रथमतः एका साप्ताहिक वर्तमानपत्रातून पत्रकारिता करण्याची संधी मिळाली व त्यानंतर अनेक वर्तमानपत्र प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमठवीत पञकार क्षेत्रात एक यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली, एका साप्ताहिकाचे प्रतिनिधी ते संपादक अशी भरारी घेणारे पञकार राजेंद्र बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला आहे. अत्यंत प्रतीकुल परिस्थितीतुन आपला व्यवसाय सांभाळत पञकारीता करणे व पञकारीतेतुन जनसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून आपल्या उत्तम लेखणीतुन अनुभवातून पञकार श्री.बनकर यांनी समाजहीत देखील अविरतपणे जोपासले आहे.आज ते ओ.एस.न्यूज चे संपादक तर दैनिक साईसंध्या या सांयंदैनिकाचे कार्यकारी संपादक आहेत,त्यांच्या अशाच सामाजाभिमूख पत्रकारितेच्या योग्य कार्याची दखल घेत शिर्डी सह पंचक्रोशीतील मान्यवरांनी त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे,
पत्रकार श्री.बनकर यांचा त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शिर्डी येथील महामंडळेश्वर महंत काशिकानंद महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी नानासाहेब काटकर,धोंडीराम शिंदे ,साहेबराव काटकर, संपत जाधव, वैभव सोनवणे,प्रवीण बनकर,योगेश काटकर, ठकाजी काटकर,नामदेव बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रम याठिकाणी शिर्डी प्रेस क्लब, मराठी पञकार संघ आयोजित ज्येष्ठ पञकार सत्कार सोहळ्या प्रसंगी दै.साईसंध्याचे कार्यकारी संपादक राजेंद्र बनकर यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व उपविभागीय (प्रांत) अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान चे मा.विश्वस्त सचिन तांबे,ज्येष्ठ पञकार बी.के.पाटणी ,शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद काका आहेर,मराठी पञकार संघाचे तालुका अध्यक्ष राजकुमार जाधव,नवनाथ दिघे, शिर्डी प्रेस क्लबचे सुनिल दवंगे, प्रशांत शर्मा, रविंद्र महाले, साई सुराळे, किरण सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थितीत होते.

