shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन . ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

एन . ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे संचलित एन . ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक मानसिंग अप्पा रणवरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर ज्ञानदेव जाधव साहेब उपस्थित होते. मेजर ज्ञानदेव जाधव साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे कवायतीचे प्रकार केले. तसेच उत्कृष्टपणे ध्वजाला मानवंदना देत संचलन करण्यात आले. त्यावेळीं शालेय अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा, शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन, इंदापूर तहसीलच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, लाखेवाडी या ठिकाणी झालेले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, यामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल व त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेने, विद्यालयाने ,उपस्थित सर्व मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच हिंदी अध्यापक इंदापूर तहसीलच्या वतीने आपल्या विद्यालयातील हिंदी अभ्यासक प्रमोद चव्हाण सर उपक्रमशील गुणवंत शिक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज संस्थेच्या वतीने चव्हाण सरांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इयत्ता बारावीचा विद्यार्थी निखिल शिंदे यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तर साक्षी ढेकळे या विद्यार्थिनी देशभक्तीपर भाषण केले. निमसाखर गावचे विद्यमान सरपंच धैर्यशील विजयसिंह रणवरे व संस्था सचिव धनंजय रणवरे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाचशे रुपयांचे पारितोषिक दिले. प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर ग्रामस्थ पालक विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय रनवरे यांनी दिवसेंदिवस विद्यालयाचा प्रगतीचा आलेख उंचावताना पाहून आनंद होत असल्याचे समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्वच ग्रामस्थ, पालक वर्ग, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. व सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय  रणवरे, यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार रणवरे, विद्यमान सरपंच धैर्यशील  रणवरे, उपसरपंच विद्याताई, माजी सरपंच जयश्रीताई अडसूळ, जाधव ताई व मुलानी ताई, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, भिलारे भाऊसाहेब, ग्रामपंचायतचे सदस्य, गोरख शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत महादेव काळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर  खरात सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर, ज्येष्ठ प्राध्यापक सूर्यकांत किसवे सर सोमनाथ, चौधर सर, समस्त ग्रामस्थ सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ मलगुंडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव हणमंते सरांनी केले.
close