shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घर गाडा सांभाळणाऱ्या घरातील सर्वांची काळजी घेणाऱ्या या महिलेला खरा अवार्ड दिला पाहिजे - सारिका दत्तात्रय भरणे.

घर गाडा सांभाळणाऱ्या घरातील सर्वांची काळजी घेणाऱ्या या महिलेला खरा अवार्ड दिला पाहिजे - सारिका दत्तात्रय भरणे.

निमसाखर पानसरे मळा येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन .
इंदापूर प्रतिनिधी:घर गाडा सांभाळणाऱ्या घरातील सर्वांची काळजी घेणाऱ्या या महिलेला खरा अवार्ड दिला पाहिजे असे  निमसाखर पानसरे मळा येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन सौ कोमल शेखर पानसरे व शेखर संतोष पानसरे यांच्या वतीने इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सौभाग्यवती सारिका दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व निमसाखर गावच्या पोलीस पाटील सौ. मोनिका अभिजीत रणवरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाला त्यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी सौ.सारिका भरणे यांनी आपले मत व्यक्त केले.
सौ जयमला रनवरे, सौ नीता रनवरे, सौ. शितल रणसिंग, सौ. मनीषा पडळकर , सौ.चैत्राली बोंद्रे , सौ.संगीता लवटे, सौ. देविका रणवरे व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सौ सारिका दत्तात्रय भरणे यांनी उखाणा घेऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हटल्या की, जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात असते. आणि मकर संक्रातीपासूनच हळदी कुंकवाचा सण म्हणून साजरा केला जातो. हळदी कुंकवाचा आनंद यामध्ये घेता येतो. तसेच महिलांना त्यानिमित्ताने एकत्र येते. एकमेकांच्या भेटीगाठी घेता येतात. हळदी कुंकवाचा हा सण सौभाग्याचं लेणं म्हणून साजरा केला जातो. मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या आरोग्याची आहाराची शिक्षणाची काळजी घ्यावी. मुलगी ही प्रत्येकाच्या घरी असावीच कारण संसाराचा गाडा मुलगी सांभाळत असते. मुलगी घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते. सांभाळते परंतु तिने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. मला यानिमित्ताने सांगायचे आहे की, मुलगी हे सर्व क्षेत्रात पुढे आहे. जिथे मुलगा असतो तिथे मुलगी असते. मुलगी झाल्यावर दुजाभाव करू नये. तिच्या शिक्षण, आरोग्य जपावे. शिक्षण ,संस्कार आईनी चांगले द्यावे मुलीचे लहान वयात लग्न करू नये. कारण लहान वयात मुलीचे लग्न केल्यानंतर तिची बिकट अवस्था होते. त्यामुळे मुलगी शिकल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर तिचे लग्न करावे. त्या मुलीला अपत्य व्हावे म्हणून सासूने लगेच सल्ला करू नये. घर गाडा सांभाळणाऱ्या घरातील सर्वांची काळजी घेणाऱ्या या महिलेला खरा अवार्ड दिला पाहिजे. कारण घरातलं घरपण सांभाळणं फार अवघड काम ती करत असते. आज मकर संक्रांतीच्या व २६ जानेवारी दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले
.
दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या समारंभास चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने महिलांना चंदूकाका सराफ यांच्या वेगवेगळ्या योजना संदर्भात माहिती देण्यात आली व आलेल्या सर्व महिलांना खाऊ वाटप करून चंदूकाका सराफ यांच्या वतीने हळदी कुंकवाच्या निमित्ताने वान म्हणून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी महिलांनी मनसोक्त पद्धतीने उखाणे घेऊन आनंदमय वातावरणात हळदी कुंकवाचा समारंभ संपन्न केला.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ निर्मला पानसरे,सौ. प्रमिला पानसरे,सौ.उज्वला पानसरे,   सौ.अनिता पानसरे,सौ.वैशाली पानसरे, सौ.प्रणाली पानसरे, सौ.अपर्णा पानसरे ,सौ. शोभा पानसरे,सौ शामल दराडे 
यांनी सर्व महिलांचे स्वागत केले तर आभार सौ.कोमल पानसरे यांनी मानले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा बालगुडे यांनी केले.
close