shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपीवरची शाळा या अभ्यास वर्गावर झेंडावंदन.


 कोपीवरची शाळा या अभ्यास वर्गावर झेंडावंदन. 
इंदापूर प्रतिनिधी: २६ जानेवारी ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन ऊसतोड कामगारांच्या कोपीवरील अभ्यास वर्गात उत्साहात साजरा झाला. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुलेनगर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कोपिवरची शाळा अभ्यास वर्ग या शाळेतील ७० विद्यार्थी , विद्यार्थीनीनी प्रजासत्ताक दिनी हजेरी लावली. हा राष्ट्रीय सण अतिशय उत्सवामध्ये साजरा करण्यात आला आहे. सकाळी ७.३० वाजता कारखाना परिसरातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी निघाली. जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, आशा घोषणा देत प्रभातफेरी जि. प. प्राथमीक शाळा महात्मा फुलेनगर बिजवडी येथे येऊन तेथील शाळेत झेंडावंदन केले . यावेळी या प्रभातफेरी मधे सहभागी होऊन कर्मयोगीचे अधिकारी  माने  यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.  
शाळेमध्ये मुलांना   खाऊचे वाटप करण्यात आले . शाळेचे प्रमुख  भारत बोराटे सर यांनी अतिशय चांगले नियोजन केले होते. त्यासाठी अनुष्का चव्हाण मॅडम , अंकिता चव्हाण मॅडम, श्रीकांबळे यांनी मुलांची चांगली तयारी करून घेतली होती .त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे उत्साहात पार पडला. यावेळी इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार  संजय शेलार सर,  महादेव चव्हाण सर   उपस्थित होते .
close