वडापुरी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकांचा केला सत्कार तर जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले विविध नयनरम्य कला गुणदर्शन सादर.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी ता. इंदापूर जि. पुणे येथे दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, माजी सैनिक, विविध शासकीय कर्मचारी ,अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये प्रथमच एकजुटीने सर्व ठिकाणी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करण्यात आले.
दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीनाथ विद्यालय येथे प्रथम श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जि प प्राथमीक शाळा वडापुरी येथे शिक्षण समितीचे अध्यक्ष अब्दुलगणी मुलांनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तलाठी कार्यालयासमोर माजी सैनिक वाल्मीक चंदनशिवे व लक्ष्मण चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जेष्ठ नागरिक भगवान फडतरे, बाबुराव शिर्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उप प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर प्रतीक्षा गार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय वडापुरी येथे सरपंच संगीताताई तरंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित अशोक कांबळे, वाल्मीक चंदनशिवे ,लक्ष्मण चंदनशिवे, पांडुरंग चंदनशिवे, युवराज करगळ, अनिल शिंदे, विश्वास माने, चंद्रकांत भाळे, जयवंत खामगळ, विशाल भारती
सर्व माजी सैनिक यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला .तसेच उपस्थित मान्यवरांचाही ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे व त्यांचे कर्मचारी तलाठी भगवान तीकूटे व त्यांचे कर्मचारी पशु पर्यवेक्षक रोहन ठवरे, उपकेंद्राचे डॉक्टर प्रतीक्षा गार्डे व त्यांचे सहकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया शेख व त्यांचे सहकारी स्टाफ, श्रीनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी तपासे व त्यांचा सर्व स्टाफ यांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.
यानंतर श्रीनाथ विद्यालय या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी व श्रीनाथ विद्यालय वडापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला या नयनरम्य अशा कार्यक्रमास गावातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली होती. फक्त उपस्थिती दर्शवली नसून प्रत्येक कला दर्शनास ग्रामस्थ व पालक वर्गांनी विशेष स्वरूपात भरघोस पद्धतीने रोखबक्षीसही देऊन विद्यार्थ्यांचा कलादर्शनाचा गुणगौरव करून कौतुक केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्रीनाथ विद्यालय संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा कक्षेमध्ये आणण्यासाठी ज्या ग्रामस्थांनी दानशूर यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्यात आले.
ध्वजारोहण झाल्यानंतर माजी सैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद उत्सव साजरा केला.व भारत मातेच्या जय घोषणा दिल्या

