शौकतभाई । शेख :-
श्रीरामपूर-तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अशोक उद्योग समुह तसेच अशोक शैक्षणिक संकुलाच्या वतीने माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर सहकारी साखर कारखान्याचा मुख्य सोहळा संपन्न झाला. कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, माजी संचालक काशिनाथ गोराणे, कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सभापती सौ.सुनीताताई गायकवाड, कारखान्याचे संचालक योगेश विटनोर, चीफ इंजिनियर बाळासाहेब उंडे, कार्यालय अध्यक्ष विक्रांत भागवत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, निवृत्ती पटारे, गॅरेज इन्चार्ज रमेश आढाव आदिंसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी कारखान्याच्या सुरक्षा विभागाने आकर्षक संचलन केले. तसेच जि.प. प्राथमिक शाळा, भास्करराव गलांडे पा. विद्यालय तसेच कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.
अशोक शैक्षणिक संकुलातील अशोक पाॕलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीने मर्चंट असोसिएशनचे संचालक बाळासाहेब खाबिया यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्री मुरकुटे, प्राचार्य अंजाबापू शिंदे तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुयोग थोरात व अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
भास्करराव गलांडे पाटील आय.टी.आय. येथे कारखान्याचे संचालक रामभाऊ कसार यांचे हस्ते तसेच कार्यालयीन अधिक्षक दत्ताञय झुराळे तसेच अध्यापक व कर्मचा-यांच्या उपस्थितीत ध्वजावंदन करण्यात आले.
अशोक आयडीअल स्कूल व अशोक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक सुनिल गुप्ता यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य रईस शेख, प्राचार्य संपतराव देसाई तसेच अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

