*अल्फीया शेखची राज्यस्तरीय हातोडा फेक स्पर्धेसाठी निवड*
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे सौ.कस्तराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या अल्फीया सलीम शेख या विद्यार्थिनीची 28 ते 31 जानेवारी रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हातोडा फेक स्पर्धेसाठी निवड झाली. नुकत्याच पंढरपूर येथे झालेल्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये तिने 27 मीटर हातोडा फेक करून 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला व गोल्ड मेडल मिळविले. तर सतरा वर्षाखालील मुलींच्या हातोडा फेक स्पर्धेतअंकिता ढावरे हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच चौदा वर्षाखालील मुलींच्या रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, डॉ श्रेणिक शहा, डॉ लहू कदम, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

