shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज अध्यक्षपदी प्रा. डॉ जावेद शेख तर सचिव पदी शिवाजी औसेकर यांची निवड !!



-------------------------------------------- 

संघाच्या कार्याध्यक्षपदी मनोराम पवार तर उपाध्यक्षपदी अनिल ठोंबरे यांच्या निवडी संपन्न

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-

केज तालुक्यातील भूमीपुत्राच्या न्याय, हक्कासाठी सदैव निर्भीड पत्रकारिता करून सत्याची बाजू मांडून अनेक सामाजिक, राजकीय , आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनतेसमोर सत्य प्रकाशात आणून देण्यासाठी ही संघटना सदैव तत्पर राहणार आहे.
 
 
सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज च्या कार्यकारिणीची  बैठक सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी  जेष्ठ पत्रकार श्री मनोराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली  ,त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.जावेद शेख यांची निवड करण्यात आली.तसेच कार्याध्यक्ष मनोराम पवार , सचिव शिवाजी औसेकर , तर उपाध्यक्षपदी अनिल ठोंबरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

तसेच सहसचिव  डॉ लतीफ शेख ,कोषाध्यक्ष गोविंद लांडगे, संघटक गोविंद शिनगारे व सदस्यपदी  कातमांडे काशिनाथ,खोगरे बाळासाहेब,भाकरे दत्तात्रय , दौंड महादेव  यांची निवड सर्वानुमते  करण्यात आल्या असून सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
close