या विरोधात आता नागरिक देखील जागरूक होत आहेत. असाच प्रकार काल सायंकाळी ५:00 वाजता समर्थ नगर भागाच्या लगत असलेल्या कृषी विभागाच्या शासकीय जागेत घडला आहे. या अधि सुद्धा ह्या भागात हा प्रकार वेळोवेळी घडला होता परंतु या भागातील जागरूक नागरिकांनी तो प्रत्येक वेळी हानुन पाढला आहे.
समर्थ नगर वार्ड क्रमांक तिन मधिल जागरूक नागरिक व युवकांनी ह्या भागात होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तरी पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल घेऊन अतिक्रमणाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी या भागातील सर्व युवकांनी एकमुखी केली आहे.
विषेश म्हणजे जेथे हे अतिक्रमण केले जात आहे त्या भागातुन मोठा नाला व मेन रस्ता समर्थ नगर भागात जात आहे. व हे रहदारीचे या भागातील नागरिकांचे मुख्य साधन आहे.
सदरील अतिक्रमण करणाऱ्या विरोधात तात्काळ कारवाई करुन अतिक्रमण रोखण्यात यावे नसता रस्ता रोखो आंदोलन करण्यात येईल असा लेखी इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.

