shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी सुमारे ११.०९ कोटी निधी मिळणार - सचिन सपकाळ यांची माहिती .

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी सुमारे ११.०९ कोटी निधी मिळणार -  सचिन सपकाळ यांची माहिती . 
इंदापूर प्रतिनिधी: पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी सुमारे ११.०९ कोटी इतका निधी मंजूर होणार असून या कामांना लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणार आहे या कामासाठी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता अशी माहिती नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी दिली.
 याविषयी बोलताना सपकळ यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून उद्घट ते पवारवाडी-  मोहितेवाडी-  कर्दनवाडी  लोहरपोनगर रस्ता (लांबी ८ किमी) अंदाजपत्रकीय रक्कम ५.७६ कोटी तसेच बावडा -बारावा फाटा- बोकडदरा -शेटफळ हवेली. ग्रा.मा. ७६ लांबी ६/६७० किमी रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ५.३३ कोटी इतक्या निधीचे अंदाजपत्रक झाले आहे. सदरील रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे मार्गी लागावी म्हणून सातत्याने जनतेची मागणी होती. या मागणीची दखल घेत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मागणीनुसार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शिफारसीनुसार गेल्या दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यांना मंजुरी मिळावी म्हणून दिनांक १३/०८/ २०२० रोजीच्या जा. क्र. पुणे /शासन इतर /०९  /२०२० पत्र व्यवहार अन्वये या रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ मधून मंजुरी मिळवली आहे. तसेच यावेळी माहिती देताना सपकळ म्हणाले, तालुक्यातील विरोधक हे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्न  करतील त्यामुळे जनतेला माहित आहे काम सुप्रिया सुळे व दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातूनच झाले.
close