शंकरराव पाटील चरीटेबल ट्रस्ट संचलित कोपीवरची शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे खजिनदार तुषार रंजनकर व संस्थचे विश्वस्त अरविंद गारटकर सर यांनी खाऊ वाटप करत साधला संवाद .
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी संस्थेचे खजिनदार तुषार रंजनकर व संस्थचे विश्वस्त अरविंद गारटकर सर यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखाना येथील ऊसतोड मजूर वसाहत येथे शंकरराव पाटील चरीटेबल ट्रस्ट संचलित कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग या उपक्रमास भेट देऊन माहिती घेतली.
या प्रसंगी तुषार रंजनकर व अरविंद गारटकर यांनी तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यासोबतच कोपिवरची शाळा अभ्यासवर्ग या उपक्रमामध्ये प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या अनुष्का चव्हाण व अंकिता चव्हाण यांच्या सोबत चर्चा केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे कर्मचारी दिपक जगताप, अख्तर शेख उपस्थित होते.

