shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सत्यजित तांबेंसाठी तरुणाई एकवटली

शौकतभाई शेख
श्रीरामपूर - नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे तरुण आणि तडफदार उमेदवार सत्यजित तांबे यांनी काल शहरातील विविध भागांमध्ये जाऊन मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी शहरातील तरुण मतदार वर्ग त्यांच्यासोबत होता. विशेष म्हणजे या सर्व भेटीगाठी मध्ये कुठेही पक्षीय चर्चा झाली नाही. सत्यजित तांबे यांच्या रूपाने एक उमदा आणि तरुण उमेदवार लाभला असल्याने आणि त्यांनी राजकीय क्षेत्रात युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलेले कार्य, त्यांचा अनुभव या सर्वांमुळे व त्यांना सर्व प्रश्नांची नेमकी जाण असल्यामुळे त्यांना विजयी करण्याचा निर्धार तरुणाईने केल्याचे काल दिसून आले. शहरांमधील या दौऱ्यामध्ये त्यांना सर्व थरातील मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .

पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी गेल्या तेरा वर्षांमध्ये आपल्या कार्याने एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. यावेळी देखील डॉक्टर सुधीर तांबे उमेदवार राहतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु ऐनवेळी डॉक्टरांनी थांबून सत्यजित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांनी आपल्या कार्य काळामध्ये समाजाच्या सर्व थरातील लोकांना एक विश्वास दिला. प्रत्येकाचे काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे मतदार संघातील आत्तापर्यंतचे ते सर्वात लोकप्रिय आमदार ठरले आहेत.

डॉक्टर तांबे यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी सत्यजित तांबे हे योग्य उमेदवार असल्याची भावना काल तरुणांमध्ये दिसून आली. त्याच बरोबर शहरातील सर्वच मान्यवरांनी त्यांना साथ देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

सत्यजित तांबे यांनी काल शहरांमध्ये इतर भागाबरोबरच वार्ड नंबर एक, फातेमा कॉलनी, मिल्लत नगर परिसरातील पदवीधर मतदारांशी संपर्क साधला. शिक्षक भारतीचे जिल्हा सहसचिव अरबाज पठाण यांच्या निवासस्थानी त्यांनी मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अंजुमभाई शेख, राजेश अलघ, ताराचंद रणदिवे, कलीमभाई कुरेशी, रज्जाक पठाण, अमानत पतसंस्थेचे उपाध्यक्ष हाजी साजिद मिर्झा, उम्मती फाउंडेशनचे संस्थापक सोहेल बारूदवाला,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस एडवोकेट समीन बागवान, एकता यंग सर्कलचे तोफिक शेख, समतादूतचे एडवोकेट मोहसीन शौकत शेख, करेज फाउंडेशनचे मुदस्सर शेख,अजिज शेख सर, सत्यनाथ शेळके सर, किशोर शिंदे, मुस्ताक शेख सर, शोएब पठाण, शाहरुख शेख, परिसरातील मान्यवर उपस्थित होते. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व डॉक्टर सुधीर तांबे यांचे कौटुंबिक स्नेही सलीमखान पठाण यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी पदवीधर मतदारसंघांमध्ये पक्षीय अभिनवेश नसतो. जनतेची कामे करणारा, जनतेला वेळ उपलब्ध होणारा उमेदवार विजयी होत असतो. असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. डॉक्टर तांबे यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केल्यामुळे त्यांनी केलेल्या जनसेवेचा लाभ निश्चितपणे सत्यजित तांबे यांना होणार आहे. मतदारसंघातील तरुणांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न यांची जाण त्यांना असल्यामुळे निश्चितपणाने ते चांगलं काम करतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
 यावेळी अनेक संस्थांतर्फे सत्यजित तांबे यांचा सत्कार करण्यात आला .सर्वांच्या भेटी घेऊन सत्यजित तांबे पुढे मार्गस्थ झाले .


श्रीरामपूर शहरांमध्ये अनेकांना मोठे करण्याचे काम डॉक्टर तांबे साहेबांनी केलं आहे. त्या लोकांनी आता हिरीरीने पुढे यावे यासाठी तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे असे नगरसेवक अंजूम शेख यांनी सांगताच सर्वांनी त्याला दाद दिली.

- मछली के बच्चे को तैरना नही सिखाया जाता असे म्हणत नगरसेवक राजेश अलघ यांनी सत्यजित तांबे सुद्धा डॉक्टर सुधीर तांबे यांच्याप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त केला.

- पदवीधर मतदार संघातील युवकांचे प्रश्न वेगळे आहेत. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी जय हिंद चळवळीच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांना संधी मिळाल्यास ते युवकांचे प्रश्न निश्चित सोडवतील असा विश्वास अमानत पतसंस्थेचे उपाध्यक्ष साजिद मिर्झा यांनी व्यक्त केला.

- मतदार संघातील तरुण वर्ग आपल्या पाठीशी आहे. तरुणांचे योग्य संघटन आपल्याला विजय मिळवून देणार आहे असे करेज फाउंडेशनचे मुदस्सर शेख यांनी सांगितले .
close