shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कल्याण रोडच्या गणेशनगर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन ...



या मंगल पर्वणीचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा - गणेश शिंदे

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २१ /  नगर- कल्याण रोड, गणेशनगर ओपनस्पेस मधील मंदीर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दि. २६/०१/२०२३ या शुभदिनी प. पु. गु. संगमनाथजी महाराज (श्रीक्षेत्र विशाल गणपती, माळीवाडा) ,ब्रम्हवृंद श्री. अनुप भणगे गुरुजी (श्रीक्षेत्र पंचवटी, नाशिक) यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला असून या मंगल पर्वणीचा गणेशनगर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे चेअरमन श्री . गणेश शिंदे यांनी सांगितले आहे .

सदर कार्यक्रम बुधवार दि . .२५/०१/२०२३ रोजी सायंकाळी ८ वाजता जलदिवास , धान्यदिवास
तसेच गुरुवार २६/०१/२०२३
सकाळी ८ वाजता मूर्ती मिरवणूक तसेच गुरुवार २६/०१/२०२३ सांय. ७ वा पंचांग कर्म, मंडल स्थापना, मूर्ती न्यास, स्नपन विधी, मूर्ती न्यास, अग्नी स्थापन, हवन, क्षेत्रपाल, बलिदान, पूर्णाहुती, मूर्ती अभिषेक, प्राणप्रतिष्ठा विधी कार्य सांगता होईल . महाआरती नंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे .

 या कार्यक्रमासाठी मा. आ. श्री. संग्रामभैय्या जगताप , मा. सौ. रोहिणीताई शेंडगे, मा. श्री. गणेशजी भोसले (उपमहापौर, अ.नगर म.न.पा.) मा. श्री. शाम आप्पा नळकांडे , (महापौर, अ.नगर म.न.पा.) मा. सौ. पुष्पाताई बोरुडे, मा. श्री. सचिन शिंदे तसेच गणेश नगर मधील सर्व सन्माननीय नागरिक आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक मा. श्री. गणेश शिंदे यांनी दिली आहे .
close