श्रीरामपूर । प्रतिनिधी :
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगाव भाग शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ऊस वाहतूक करणारे ऊस तोडणी गाडीवान अनिल रामदास मोरे तसेच जुगाड चालक नानासाहेब दगडू मेचे यांचे सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात अपघाती निधन झाले होते. त्यांचा विमा संरक्षणाचा प्रत्येकी ३ लक्ष रुपयांचा धनादेश मयताचे वारस श्रीमती सुरेखा अनिल मोरे व श्रीमती रेखा नानासाहेब मेचे यांना अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते नुकताच देण्यात आला.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगाव भाग शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत ऊस वाहतूक करणार्या ठेकेदार व मजुरांचा विमा उतरविला जातो. गेल्या दोन वर्षापूर्वी कारेगाव भाग कंपनी मार्फतचे ऊस तोडणी मजूर कै.अनिल रामदास मोरे व कै.नानासाहेब दगडू मेचे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांचा कंपनीने अपघात विमा उतरविला असल्याने इन्शुरन्स कंपनीकडे क्लेमची पूर्तता करण्यात आली होती. त्यानुसार राहुरी येथील युनायटेड इंडिया इंन्श्युरन्स कंपनीकडून मंजूर झालेल्या प्रत्येकी रु.३ लक्ष रुपयांचा धनादेश मयत मजुराची पत्नी श्रीमती सुरेखा अनिल मोरे व श्रीमती रेखा नानासाहेब मेचे यांना अशोक कारखान्याचे चेअरमन श्री. मुरकुटे यांचे हस्ते देण्यात आला.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक सोपानराव राऊत, कारेगाव भाग कंपनीचे संचालक शैनेश्वर पवार, कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, चीफ अकाऊंटंट मिलिंद कुलकर्णी, कारेगाव भाग कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख आदी उपस्थित होते.

