श्रीरामपूर । प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती व प्राईडच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर- वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड ॲकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूल ॲन्ड ज्युनि.कॉलेजमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
क्रीडा स्पर्धचे उद्धघाटन
ऑकलंड,न्यूझीलंड राष्ट्रकुल कॉमन वेल्थ पावर लिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल विजेते प्रा.सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे होते,
याप्रसंगी स्विमिंग गोल्ड मेडल अक्षय शिंदे, नवनाथ टेकाळे, अण्णासाहेब पाटील, नानासाहेब जुन्धारे, डॉ. सर्जेराव सोळुंके, नाना बडाख ,अरुण सोळुंके प्रा. कार्लस साठे, नयन गांधी,अर्जुन राऊत आदि मान्यवर उपस्थित होते. प्रा.सुभाष देशमुख म्हणाले की - श्रीरामपूर तालुक्यातील शैक्षणिक वैभवात भर टाकण्याचे काम प्राईड ॲकेडमी करत आहे. या शाळेतून निश्चितच आदर्श विद्यार्थी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लहान मुलांनी केलेले परेड संचालन अंगावर शहारे आणणांरे आहे, असे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
अभ्यासासोबतच आपल्या जीवनात खेळाचेही महत्त्व वाढवा. खेळामुळे आपले आरोग्य सुधारते, ज्या प्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनात भौतिक सुख: सुविधा ज्या प्रमाणात गरजेच्या असतात त्याच प्रमाणे आपले सुदृढ आरोग्य ही तितकेच महत्वाचे असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ खेळले पाहिजे, खेळातून आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो व क्रीडास्पर्धा या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठीच असतात.आजच्या काळात मुले मोबाईल फोनवर खेळ खेळताना दिसून येतात. ते खेळण्यापेक्षा मैदानावर या मैदानी खेळ खेळा. आज विद्यार्थ्यांना खेळताना पाहून मला माझे विद्यार्थी जीवन आठवते.त्यांनी परदेशात खेळाला फार महत्त्व आहे. खेळाडूंनी नेहमी चांगले प्रदर्शन करून राज्य व देशपातळीवर नाव कोरले पाहिजे.असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे,नाना जुन्धारे, डॉ. सोळुंके, नाना बडाख यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्राचार्या श्रीमती.प्रीती गोटे यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलनानंतर स्पर्धेचे उद्गघाटन होवून स्पर्धेत कब्बडी, खो-खो,रिले,रस्सीखेच, लांब उडी, उंच उडी, तसेच बेडूक उड्या, लिंबू चमचा, शर्यत, बॅकवॉकिंग, ब्रिक्सवॉकिंग असे खेळ घेतले गेले. कॉलेजचे
प्राचार्य सुरेश कोकणे यांनी आभार मानले.
विद्या लोखंडे ,शिंदे शांभवी व मेकडे जुई यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बापूसाहेब पिसाळ, क्रीडा शिक्षक ऋषिकेश शिरसाठ इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

