श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक उद्योग समुह तसेच अशोक जिमखाना आयोजित 'लोकनेते माजी आ.भानुदास मुरकुटे चषक' खुल्या टी-२० लेदर बॉल स्पर्धेचा उदघाटन सोहळा माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे हस्ते दिमाखात संपन्न झाला.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना कार्यस्थळावरील अशोक स्टेडीयमवर सदरच्या स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामांकीत ३२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी सभापती सौ.सुनिताताई गायकवाड, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, कारखान्याचे संचालक आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, योगेश विटनोर, रामभाऊ कसार, वाय.जी.बनकर, ज्ञानेश्वर काळे, युवक नेते निरजभैय्या मुरकुटे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या स्पर्धेसाठी रु.१ लाख २१ हजार (प्रथम), रु.७१ हजार (व्दितिय), रु.२१ हजार (तृतिय) व रु.११ हजार (चतुर्थ) व चषक अशी सांघिक, तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेञरक्षक अशी वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी बापूसाहेब कोळसे, जुबेर इनामदार, बॉबी बकाल, दिपक राऊत, जमिल पठाण, भैय्या शेख, मुन्ना सय्यद, अशोक बोरुडे, संदीप आरसुले, संतोष सावंत, भाऊसाहेब पगारे, मुमताज शेख, योगेश डेंगळे, यासिन शेख, सुधांशू तावडे, संतोष हतांगळे, भारत वाघमारे, राजू शेख, जालू वडनेरे, प्रमोद मेनकुदळे, सहदेव पिंपळे, वासिम सय्यद, दिनेश ठोंबळ, अस्लम शेख आदि प्रयत्नशील आहेत.

