प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
हिंदु धर्मातील प्रत्येक उत्सवातुन समाजाला मार्गदर्शक संदेश असतो.मकर संक्रांतीच्या सणातुन तर मानवी जीवनाला गोड व खरे बोलण्याचा संदेश मिळतो.
असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या नवनिर्वाचित अधिसभा सदस्या अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनी केले.
त्या समर्थनगर मध्ये डॉ.आशा बोबडे,सौ.सुरेखा वायबसे व इतर महिलांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभात बोलत होत्या.
सौ.अर्चनाताई आडसकर पुढे म्हणाल्या की या संस्कृतीतुन महिला एकञित होवुन प्रत्येकीच्या कला गुणांना वाव मिळतो.
या कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मता,कोव्हीड संरक्षण इत्यादी विषयावर रांगोळी प्रदर्शन व देखावे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन डॉ.आशा बोबडे,सौ.सुरेखा वायबसे,माधुरी तोटेवाड,दिपिका मांडलीया,शुभांगी कुलकर्णी ,प्रिया कुलकर्णी ,राजेश्री मुंडे,दिपाली मुंडे,मनिषा जाधव,प्रतिमा तारळकर,मनिषा थोरात,मनिषा कुलकर्णी ,प्रणिता इनामदार,सौ.कुलकर्णी ताई व इतर महिलांनी सुंदर व आशयपुर्ण नियोजन केले होते.सर्वांना फराळ देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

