shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगणगाव व हमिदपुरमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ०५ जानेवारी २०२३

हिंगणगाव व हमिदपुरमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन..!!

हिंगणगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित कृषी महाविद्यालय विळद घाट अहमदनगर ,अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला.
         या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय शिंदे लाभले . व प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. एम एस राजळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी उपस्थित हिंगणगावचे सरपंच आबा पाटील सोनवणे ,उपसरपंच वैभव ताकपेरे , हमिदपुर सरपंच निलेश वैराळ,कृषी सहाय्यक वर्षा काळे मॅडम, कृषिमित्र शाम कांडेकर,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी धोंडे सर,उपप्राचार्य एस बी राऊत,कार्यक्रम समन्वयक प्रा के एस दांगडे,कार्यक्रम अधिकारी एच एल शिरसाठ सर,खेडकर सर आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे प्रा के एस दांगडे सर यांनी सत्कार केला.

      कार्यक्रम प्रसंगी डॉ. राजळे यांनी लंपी आजारावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शेतीमध्ये केलेल्या स्ट्रॉबेरी व सफरचंद याच्या लागवडीपासून यशस्वी उत्पादनबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक के एस दांगडे सर यांनी एकात्मिक शेती व्यवस्थापन या बद्दल मार्गदर्शन केले.
 तसेच कृषी सहाय्यक काळे मॅडम यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांची माहिती दिली.
      अजय बायो टेक इंडिया लि. या कंपनीचे प्रदेश व्यवस्थापक श्री. सतीश सोनवणे सर यांनी जैविक शेती व मृदा परीक्षण याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच इतर सर्वच मान्यवरांची उपस्थती लाभली त्यानंतर कृषीदुतांनी सर्वांचे आभार मानले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

    
close