"राष्ट्राची सेवा करण्याची मूल्य संस्कार शिबिराच्या माध्यमातून रुजवली जातात " - मनोज पाटील
इंदापूर प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा. याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीर २९ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ या कालावधीत मु.पो.बोराटवाडी ता.इंदापूर जि.पुणे या ठिकाणी संपन्न झाले .
सदर शिबिराचे उद्घाटन श्री.शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष .मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आजच्या युवा पिढीतील वाईट विचाराचा, विकृती नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रम संस्कार शिबीराची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीची सेवा करण्याची बीज रूजवण्याचे काम केली जाते.त्यामुळे विद्यार्थ्यानी समाजाची, राष्ट्राची सेवा मनापासून करण्याचा संस्कार रूजवावा असे आवाहन केले. सदर शिबिरात मध्ये स्वयंसेवकांनी बोराटवाडी गावांमध्येआणि लोकनेते शाहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी येथे ग्राम स्वच्छता केली. त्याबरोबरच ग्राम सर्वेक्षण करून नवीन वर्ष निमित्त १२३ झाडाचे वृक्षारोपण केले.
त्याबरोबरच गावातील ४५० मिटर असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुरूम टाकला.नवीन मतदारांची जनजागृती करून नवीन मतदारांचे फाॅर्म भरून घेतले. सदर शिबिरात मध्ये प्रा.प्रशांत बंगाळे, प्रा माधुरी फडतरे, डाॅ.तायाजी लोंढे प्रा.सुदर्शन गोळे, प्रा.दत्तात्रय शिंदे, प्रा.प्रविण घोगरे, प्राचार्य. भिमराव अवारे सूत्रसंचालक मा.श्री. निलाखे सर इत्यादी मान्यवरांनी शिबिरात कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काव्य वाचन, वादविवाद, फॅन्सी ड्रेस, रांगोली नृत्य, गीत गायन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. शिबिराच्या समारोप समारंभात पाहुणे म्हणून बोराटवाडी गावचे सरपंच दत्तू अण्णा सवाशे, तर अध्यक्षस्थानी दयानंद गायकवाड साहेब होते. .सर्जेराव खुसपे कृष्णा बोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासतुकाराम बर्गे, .लालासाहेब हेगडकर, मा.श्री.हेमंत सुदरीक , बोराटवाडी गावाच्या ग्रामसेवक सौ.शेंडगे मॅडम, प्राचार्य भिमराव अवारे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य. लहू वावरे यांनी केले. सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय मोरे केले. तर आभार प्रा.दत्तात्रय शिंदे यांनी मानले. या शिबिरात 50 स्वयंसेवक सहभागी झाले होते . सदर कार्यक्रमास लोकनेते शाहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी येथील शिक्षक आणि श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील मा सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक . उदयसिंहजी पाटील* , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मनोजराव पाटील* , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सरपंच.किरणराव पाटील* व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

