shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडणी ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रफुल्लकुमार तानाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड.

रेडणी ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रफुल्लकुमार तानाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: रेडणी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून आज दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत रेडणी कार्यालय येथे उपसरपंच निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व भिगवन बांधकाम विभाग शाखा अभियंता सुरेश म्हसवडे आणि ग्रामसेविका अंबिका पावसे यांच्या उपस्थितीत व सरपंच श्रीमती हिराबाई देविदास खाडे यांच्या अध्यक्षतेखाली   प्रफुल्लकुमार तानाजी चव्हाण यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष तुकाराम शिर्के, मुक्ताबाई रामचंद्र काळकुटे, सविता राजेंद्र सोनटक्के, पुष्पा संतोष काळकुटे ,कोमल विश्वास लोंढे हे उपस्थित होते.
उपसरपंच निवडीनंतर गावातील अनेक ग्रामस्थ व बहुजन ग्रामविकास पॅनलचे कार्यकर्ते यांनी गुलाल व फटाक्यांच्या आकाशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.
 यावेळी सहकार महर्षीचे संचालक विश्वास काळकुटे, भानुदास खाडे, अनंतराव काळकुटे, नरेंद्र भोसले ,मच्छिंद्र तरंगे, प्रकाश शेंडगे ,शैलेश तरंगे ,अजित शेंडगे ,सोमनाथ काळकुटे, संतोष काळकुटे, पोपट काळकुटे, राजाभाऊ सोनटक्के ,नवनाथ खाडे ,सुनील खाडे, सचिन डोईफोडे, बाळासाहेब खाडे, भारत खाडे, ब्रह्मदेव ढोले ,संजय काळकुटे ,भगवान खाडे, हनुमंत घोगरे, नितीन बाळे ,मोहन तरंगे ,पप्पू चव्हाण, सतीश काळकुटे, दुर्योधन काळे, रघुनाथ काळे, धर्मराज काळे ,लक्ष्मण काळे, पोपट काळे ,विलास काळे ,उमेश शिर्के, अतुल शिर्के ,गणेश शिर्के, किरण शिर्के ,महादेव शिर्के, सर्जेराव नायकुडे, धनाजी नायकुडे, सुरेश कदम, विजय लोंढे, नवनाथ साठे, हरिभाऊ काळकुटे ,राजाभाऊ सोनवले,अमोल साठे, विश्वास लोंढे ,स्वप्नील चव्हाण, समाधान चव्हाण, रोहित चव्हाण, तानाजी काळकुटे, रणजीत काळकुटे इत्यादी उपस्थित होते. 
सदर निवडून आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्य हे हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील असे प्रचार प्रमुख अमरदीप काळकुटे यांनी माहिती दिली.
close