सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध होते - ऐ .पी.आय. विक्रमसिंह साळुंखे .
एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखरचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे या ठिकाणी २ जानेवारी २०२३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमसाखर येथील उद्योजक विनोद रणसिंग होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. विक्रम साळुंखे हे होते. या कार्यक्रमास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभाग पोलीस अधिकारी विनोद पवार, निमसाखर ग्रामपंचायतचे माजी सरपंच गोविंद रणवरे ,तंटामुक्ती अध्यक्ष संतोष रणवरे ,इंदापूर तालुका युवा सेनेचे नेते सुदर्शन रणवरे, इंदापूर तालुका उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष लालासो चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, पांडुरंग पानसरे, सुनील मोरे, पत्रकार तात्याराम पवार तसेच वरील मान्यवरांचा सत्कार संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, संस्था उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे, यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे, पर्यवेक्षक मधुकर खरात यांच्या हस्ते करण्यात आला, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ऐ पी.आय. विक्रमसिंह साळुंखे म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध होते, यातूनच अनेक कलाकार घडत असतात, खूप शिका मोठे व्हा व आई वडिलांचे नाव कमवा असा मौलौकिक संदेश दिला. विद्यालयातील सर्व नियोजन व्यवस्था पाहून साळुंखे यांनी खूप समाधान व्यक्त केले.
तसेच संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे आपल्या मनोगतात म्हणाले की, अशा सांस्कृतिक कार्यक्रमातूनच एखादा आदर्श कलाकार जन्म घेऊ शकतो. दैनंदिन अभ्यासाबरोबरच खेळ क्रीडा सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे प्राचार्यांनी सहर्ष स्वागत केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक नागरिक विद्यार्थी सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मालगुडे, आशा पर्वते, स्वप्नाली पाटील ,सोनाली शेंडे व अनुराधा सचिन रणवरे यांनी केले.
यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रकारचे नियोजन केले होते.

