shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका काँग्रेस ओबीसी सेलच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब बोराटे यांची निवड.

इंदापूर तालुका काँग्रेस ओबीसी सेलच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब बोराटे यांची निवड.
     इंदापूर प्रतिनिधी -अखिल भारतीय काँग्रेस   पक्षातील  ओबीसी सेलच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी शेटफळ हवेली येथील युवा कार्यकर्ते बापूसाहेब बोराटे यांची निवड आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,पुणे जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष व पुरंदर-हवेली चे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.
 यापूर्वी त्यांनी इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस पदावर काम केले आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवल्याने त्याची दखल घेत काॅंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे.
     
यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष बापूसाहेब बोराटे म्हणाले की, आपल्याला समाजकार्याची आवड आहे.मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्षहित बरोबरच पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहू तसेच काॅंग्रेस ओबीसी सेलच्या माध्यमातून लोकांना  न्याय देण्याचा प्रयत्न करू.  त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण पक्षाच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करणार असून जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला. 
      यावेळी इंदापूर तालुक्यातील काॅंग्रेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बापूसाहेब बोराटे समर्थक  उपस्थित होते.
close