shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चाकाटी येथे उडान महिला ग्रामसंघाची स्थापना.

चाकाटी येथे उडान महिला ग्रामसंघाची स्थापना.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत ५ दिवसीय निवास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत ५ दिवसीय निवास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये एकूण ६ महिला बचत गटांना जोडून ६५ महिलांचे संघटन करून उडान ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली. यावेळी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण, महिला सबलीकरण, सामाजिक राजकीय व्यावसायिक तसेच गरीब विमुक्त महिला सक्षमीकरण अशा विविध विषयी व्यवस्थित माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी वर्धा येथून आलेल्या वरिष्ठ वर्धिनी वंदना धनराज मुरमुरे, कविता प्रकाश ढोले ,शुभांगी प्रवीण बाखरे यांनी ५ दिवस निवासी राहून महिलांना प्रशिक्षण दिले. तसेच दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 यावेळी पंचायत समिती च्या राणी ननवरे मॅडम, प्रभाग समन्वयक सुनिता दातखिळे मॅडम यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी चाकाटी गावचे सरपंच संजय रुपनवर, ग्रामसेवक मोहिते यांनी महिलांचे संघटन करून हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले .त्याचबरोबर सतीश तरंगे, केशव वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य समाधान घोडके, संगणक परिचालक शिवाजी वाघमोडे, उमेश दोरकर यांनी सहकार्य केले.
close