shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

इंदापूर प्रतिनिधी:श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मराठी विभाग 'राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .दिनांक ९ जानेवारी ते २३ जानेवारी २०२३ या कालावधीत विविध स्पर्धेत भाग घेत विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेऊन पारंपरिक वेषभूषा करून या पधरवड्याची सांगता केली सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. लहू वावरे याच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले "भाग्य बोलतो मराठी
  झालो खरेच धन्य ऐकतो मराठी
जात धर्म पंथ एक मानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
  झालो खरेच धन्य ऐकतो मराठी
जात धर्म पंथ एक मानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"

   १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये *मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा* मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे हेतू एकच की मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा म्हणून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो खरोखरच मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा का केला जातो व त्याची गरज का पडली कारण आजच्या पिढीमध्ये पालकांचा खूप मोठा न्यूनगंड झालेला आहे की आपला मुलगा मुलगी मोठ्या शाळेमध्ये शिकली म्हणजेच हुशार वृत्तीची आहेत हा खूप मोठा गैरसमज आहे म्हणून मराठी शाळा ओसाड पडू लागले आहेत हे कितपत योग्य आहे की मराठी शाळा बंद पडले आहेत जर मराठी शाळेतून विद्यार्थी उच्च पदावर ती जाऊ शकतो तर मराठी शाळा का बंद पडाव्यात हा मोठा प्रश्न या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा यामध्ये निर्माण होतो आणि याचेच उत्तर आज आपल्याला शोधायचे आहे.        प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना प्रा.रोहिणी सावंत मॅडम म्हणाल्या की आज १६५२ भाषांपैकी ७८० भाषा उरले आहेत. काही भाषा लोप पावल्या  आहेत. यामध्ये मराठी भाषेचा देखील वापर खूप कमी प्रमाणामध्ये होऊ लागला आहे आणि इंग्रजी हिंदी अशा भाषा यांचा उपयोग जास्तीत जास्त होऊ लागला आहे. मी म्हणत नाही की इतर भाषा आचरणात आणल्या नाही पाहिजेत. पण आपल्या मातृभाषेला म्हणजेच मायबोलीला विसरता कामा नये जर मातृभाषेला आपण विसरलो तर आपण त्यामध्ये संस्कृतीला लोककलेला विसरत जाईल

ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी
शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी 
संतांनी वाढवला तो वाण मराठी
मी मराठी मी मराठी

आज जपान जर्मनी यासारख्या देशांनी आपल्या भाषेवर इतर भाषांचे प्रभुत्व गाजवून दिले नाही मग आपण आपल्या मायबोली मातृभाषेला विसरून जमेल का आणि विसरणं कितपत योग्य आहे जर संतांनी त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी साडेचार हजार ग्रंथ लिहिले तर आपण ते निदान वाचले तरी पाहिजेत म्हणजे मराठीचं संवर्धन होईल आणि मराठी भाषेसाठी आपण नक्कीच संवर्धनासाठी एक पाऊल पुढे असो आज संस्कृत भाषा मागे पडत चाललेली आहे आज संस्कृत भाषा ही फक्त काही वर्गांपुरतीच मर्यादित आहे मग जर संस्कृत भाषा मागे पडत असेल तर मराठी भाषा देखील मागे पडणार म्हणून आपण आपल्या भाषेचा संवर्धन करणे खूप गरजेचे आहे उदाहरणार्थ रामदास स्वामी हे फकीर होते पण त्यांनी आपल्या झोळी मध्ये धान्य बरोबर डायरी टाक आणि दौथ बरोबर ठेवत असत आणि ते म्हणतात की ग्रंथामध्ये लिहीत जावे प्रसंगी वाचत वाचत जावे म्हणजे मराठी भाषेमध्ये शब्दांचा साठा वाढेल कोणतेही भाषेचा वैभव त्याच्या साहित्यावर अवलंबून असते आणि मराठी भाषेचे वैभव म्हणजेच साहित्य लोककला वेशभूषा परंपरा यावर अवलंबून आहे साहित्य हे मराठी भाषेचा माहेरघर आहे आणि या माहेरघराची जपणूक केली पाहिजे म्हणजेच मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली पाहिजे जो संतांनी वाण दिलेला आहे जी संस्कृती दिलेली आहे या मातृभूमीला शिवरायांसारखे ज्ञानदेवांसारखे संत तुकाराम महाराजांसारखे थोर महात्मे मिळालेले आहेत त्यांचा मिळालेला वान संस्कृती आपण पुढे चालवली पाहिजे मी म्हणतच नाही की इतर भाषा बोलू नका पण आपल्या मायबोलीला विसरू नका संत विनोबा भावे यांना सात भाषा लिहिता आणि वाचता येत होत्या. मी तर आवर्जून म्हणेल की एका भाषेपेक्षा अधिक भाषा तुम्ही शिकल्या पाहिजेत पण या भाषा शिकत असताना आपल्या मातृभाषेला विसरू नका

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संघाने जगल्या तरी खोऱ्यातील शिळा.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.दिप्ती पाटील होत्या.प्रसंगी बोलताना म्हणाल्या 

मी म्हणेल की मुळातच भाषा संवर्धन करण्यापेक्षा ती समृद्ध केली पाहिजे म्हणजेच आपण आपल्या मातृभाषेला समृद्ध करूया

 आणि एवढेच म्हणेल की
पुन्हा जन्म झाला तर
जर दगड झाले तर सह्याद्रीचा होईल
माती झाले तर महाराष्ट्राची होईल
तलवार झाले तर आई भवानी मातेची होईल
आणि पुन्हा जन्म झाला तर मी मराठीच होईल मराठीच होईल.
    प्रास्ताविक प्रा.  अर्चना हरेहर मॅडम यांनी केले.सूत्रसंचालन कुमारी वर्षां अनपट आणि शुभांगी शिंदे यांनी केले.अभार प्रा.मोनाली बंगाळे यांनी मानले.सदर कार्यक्रमास प्रा.प्रविण घोगरे,प्रा.सोनम पवार,प्रा.माधुरी फडतरे प्रा सुदर्शन गोळे प्रा.प्राजक्ता बागल डाॅ.संजय मोरे  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close