हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमाने साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.ते खालीलप्रमाणे
१)शिवसेना जनसंपर्क कार्यालय इंदापूर येथे सकाळी १०.३०वाजता साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
२) उपजिल्हा रुग्णालयात इंदापूर येथे रुग्णांना फळे वाटप
३) आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप राममंदिर
४) निमसाखर येथे प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वाटप व खाऊ वाटप.
५) शिवसेना जनसंपर्क कार्यालय निमगाव येते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
६)सणसर इ.बंगला येथे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप.
७) रेडा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
८)शेटफळ हवेली,भिगवण , तक्रारवाडी, डिकसळ, ग्रामपंचायत कार्यालय येथे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

