shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर प्रीमियर लीगमध्ये यशवंत अभ्यासिका संघ विजयी

इंदापूर प्रीमियर लीगमध्ये यशवंत अभ्यासिका संघ विजयी 

इंदापूर तालुक्यात क्रिकेट सामन्याला उदंड प्रतिसाद 
फोटो : इंदापूर प्रीमियर लीग २०२३ चे विजेते यशवंत अभ्यासिका संघाला चषक व पारितोषिक देताना मान्यवर
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, शिवदत्त प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, इंदापूर प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट सामान्यांमध्ये, शहरातील यशवंत अभ्यासिका क्रिकेट संघाने पै. रोहित पवार क्रिकेट संघावर मात करीत चषका वर विजयाची मोहर उमटवली.यावेळी संघाला प्रथम पारितोषिक नगरशेठ ऍड. भरतशेठ शहा यांच्या हस्ते चषक व ४१ हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले. 

इंदापूर शहरातील नगरपालिका मैदानावर तीन दिवशीय सामने रंगले होते. अंतिम सामना रविवार ( दि. २२ जानेवारी ) रोजी पार पडला. यामध्ये द्वितीय पारितोषिक दिलीपशेठ शाहू भाळे यांच्या वतीने चषक व २१ हजार रोख पै. रोहित पवार क्रिकेट क्लबला मिळाले. तर तृतीय पारितोषिक सरडेवाडीचे सरपंच सिताराम तात्या जानकर यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम ११ हजार रुपये, अजिंक्य जावीर क्रिकेट क्लबने जिंकले. तर शिवदत्त जनकल्याण क्रिकेट संघाला चतुर्थ पारितोषिक सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. 

यावेळी मालिकावीर म्हणून खेळाडू अभिजीत भांगे, उत्कृष्ट फलंदाज प्रसाद गलांडे यांना बॅट व सन्मानचिन्ह, मॅन ऑफ द मॅच संगम खवले, उत्कृष्ट प्रेक्षक आयुष संजय शिंदे यांना सन्मानचिन्ह व स्पोर्ट शूज, युवा उद्योजक किरण कणसे, सामजिक कार्यकर्ते दिलीप शाहू भाळे, अनिल अण्णा पवार, संजय डोनाल्ड शिंदे, नितीन हेगडकर, रोहित बंडा पाटील व सचिन चौगुले यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट झेल घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आव्हान प्रतिष्ठानच्या वतीने पाचशे रुपये रोख बक्षीस देण्यात आले. 

यावेळी सामने यशस्वी करण्यासाठी अविनाश चौगुले, विशाल पवार, रोहित पवार, अक्षय देवकर, करण चौगुले, तुषार धोत्रे, संजय खंडागळे, आव्हान प्रतिष्ठान व आमचे मेंबर मित्र परिवार यांनी प्रयत्न केले. तर इंदापूर तालुक्यातुन, या क्रिकेट सामन्याला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभला. 


close