shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याचे नाव राज्यावरती जाईल. यावर आपण सर्वांनी प्रयत्न करा - आमदार दत्तात्रय भरणे.

विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याचे नाव राज्यावरती जाईल. यावर आपण सर्वांनी प्रयत्न करा - आमदार दत्तात्रय भरणे.

पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिक्षण विभाग इंदापूर यांच्या वतीने जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने  ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
 
इंदापूर प्रतिनिधी: विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याचे नाव राज्यावरती जाईल. यावर आपण सर्वांनी प्रयत्न करा असे
 पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिक्षण विभाग इंदापूर यांच्या वतीने जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने  ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २३जानेवारी २०२३ व २४ जानेवारी २०२३रोजी लाखेवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर विज्ञान प्रदर्शन हे इयत्ता ६वी ते ८वी व इयत्ता ९वी ते १२ वी व शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्यनिर्मिती इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९वी ते १२वी त्याबरोबरच वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, परिचर गट साधन,प्रश्नमंजुषा स्पर्धा  अशा गटामध्ये आयोजन करण्यात आले.या  विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या उपस्थितीत उपस्थित पार पडले. या पूर्वी आयोजित समारंभ प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी व तालुक्यातील  शिक्षक पालक वर्ग यांना संबोधित करताना म्हणाले.

तसेच भरणे म्हणाले  की, नीट नीटके नियोजन जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी या संस्थेने केले त्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी विद्यार्थी विद्यार्थिनी सह सर्वांचे आभार मानतो. नियोजनाच्या बाबतीमध्ये शिक्षण संस्थेच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये नाद नाही करायचा ढोले सरांचा तुम्हाला सांगतो विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून २०० प्रकल्प सादर केले जात आहेत. त्यामधून विज्ञानाची गोडी तयार होते. निर्माण होते. विज्ञानामुळे शेतीमध्ये क्रांती झालेली पाहतो. अनेक आपल्याला औषधे, बियाणे, पूर्ण गोष्टीने शेतामध्ये उत्पन्न वाढवता येते. प्रत्येक क्षेत्रात आज विज्ञानाला खूप मोठे आगळावेगळा महत्व आहे. आपल्याला ते पाहायचं आहे. अनेक  शाळा या ठिकाणी हे प्रदर्शन पाहणार आहेत. मला निश्चित प्रकारे आनंद होईल की माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये जे २०० प्रकल्प सादर केले जाणार आहेत. त्यातील प्रकल्पाचा जिल्ह्यात नंबर लागावा एवढी निश्चित आम्हाला अपेक्षा आहे .या प्रकल्पांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिपाई पासून शिक्षिकापर्यंत सर्वांनी मदत केलेली आहे. इंदापूरचे विद्यार्थी म्हणून अभिमान आहे. 

पूर्वीचे लाखेवाडी आणि आजची लाखेवाडी मध्ये काय फरक पडतो. या संस्थेच्या माध्यमातून अनेक  विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती व व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न होत आहे. चित्रलेखा ढोले ताई सर्वांना चांगले मार्गदर्शन करीत असतात. लाखेवाडीची विद्यार्थी टापटीप पाहिल्यानंतर पुण्याच्या शाळेत असल्यासारखी वाटते. विद्यार्थी हा आनंदी उत्साही वाटला पाहिजे. अभ्यास करताना अभ्यासाचा जिव्हाळा असला पाहिजे. अभ्यास करताना मनाची तयारी करून अभ्यास केला पाहिजे. ढोले सर तुम्हा दोघांचे आभार मानले पाहिजेत. तुम्हाला या संस्थेबद्दल जीवाळ आहे. प्रेम आहे. हे विद्यार्थी देशाचे खूप मोठे नागरिक बनले पाहिजेत. चांगले अधिकारी, डॉक्टर ,इंजिनिअर बनले पाहिजे. ही तळमळ पाहून आम्हाला हेवा वाटतो आहे. या संस्थेविषयी आदरणीय पवार साहेब ,दादांचा, ताईंचा उल्लेख केला. मी तुम्हाला एवढेच सांगतो संस्थेला जे काही लागेल. जे काही सहकार्य लागेल. ते आमदार व तुमच्या घराचा कुटुंबातला घटक या नात्याने या संस्थेला जे काही मदत लागेल. शासनाच्या वतीने प्रयत्न आमच्यासारखी कार्यकर्ते प्रामाणिकपणे करतील. या संस्थेच्या मागे खंबीरपणे उभा राहतील. हा शब्द आज देतो. 

ज्यांनी प्रकल्पामध्ये भाग घेतला आहे. त्या सर्वांना विनंती करायचे आहे .खूप तुम्ही खूप चांगले प्रकल्प सादर केले आहेत. यातून माझ्या इंदापूर तालुक्याचा नावलौकिक कसा वाढेल जिल्ह्यात राज्यात हे प्रकल्प कसे जातील. राज्यात जिल्ह्यात आपल्या तालुक्याचे नाव आलं तर अभिमान वाटल. तुम्हाला सर्वांना ही संधी मिळाली आहे. तालुक्याचे नाव राज्यावरती जाईल. यावर आपण सर्वांनी प्रयत्न करा. शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी आपले मत व्यक्त केले तर  प्राचार्य सम्राट खेडकर यांनी प्रास्ताविक केले.
 
या उद्घाटनाप्रसंगी विजयकुमार परीट गटविकास अधिकारी पं. स.इंदापूर, राजकुमार बामणे  गटशिक्षणाधिकारी पं. स.इंदापूर, प्रदीप गुरव मा.गटशिक्षणाधिकारी पं.स.इंदापूर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे, बाळासाहेब करगळ, खडे गुरुजी, राजेंद्र वाघमोडे,इंदापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर सरपंच संजय रुपनवर राष्ट्रवादीचे इंदापूर युवक अध्यक्ष सचिन काळे, जेबिव्हीपी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे श्रीमंत ढोले ,संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडीगावच्या विद्यमान सरपंच सौ. चित्रलेखा ढोले , संस्थेचे सचिव  हर्षवर्धन खाडे  ,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी  गणेश पवार  , फार्मसी कॉलेजचे प्राचार्य  सम्राट खेडकर  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत प्रदर्शन भरले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेखा सुरवसे ,श्रीमंत गुरव , व प्रवीण शिंदे  यांनी केले.


याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्व विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी चर्चा केली व त्यानंतर संस्थेच्या लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी घसरगुंडी उपलब्ध केलेल्या ठिकाणी लहान मुलांसमवेत मान्यवरांनी खेळाचा आनंद घेतला. 
close