shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र एरोस्केटो बॉल असोसिएशनच्या वतीने निवडचाचणी व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ...


प्रतिनिधी :संजय वायकर

नगर : १२ / आठवी एरोस्केटो बॉल राष्ट्रीय स्पर्धा, एरोस्केटो बॉल फेडरटीओन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र एरोस्केटो बॉल असोसिएशन यांच्या वतीने  ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहेत.

या स्पर्धांसाठी अहमदनगर जिल्हा एरोस्केटो बॉल संघटना यांच्या वतीने शनिवार व रविवार दि . १४ व १५ रोजी वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत निकम यांनी दिली . सदर निवड चाचणी मधून उत्कृष्ट खेळाडू संघ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व आगामी होणार्‍या  राष्ट्रीय स्पर्धांमध्ये करणार असल्याचे स्वागत अध्यक्ष श्री. महेश बगल यांनी सांगितले . या स्पर्धा १० वर्ष खलील, १४ वर्ष खलील मुले व मुली तसेच खुला गट (पुरुष व महिला) यांच्यासाठी होणार असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्षी श्री. सचिन गायकवाड यांनी केले.

या स्पर्धांसाठी खेळाडूंना नाव नोंदणी करणे अनिवार्य असणार असून १० वर्ष खेळाडूंसाठी  १ -१ -२०१३ (जन्म साल) १४ वर्ष खेळाडूंसाठी १ -१ - २००९ (जन्म साल) तसच खुला गट पुरुष व महिला या किमान १७ वर्ष व त्या पुढील असाव्यात. नाव नोंदणी साठी ८२७५१९१७७१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा .      या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे सकाळी ९ ते ११ वाजता १४ व १५ रोजी जानेवरी रोजी होणार आहेत व स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने होणार असून या अधिकृत स्पर्धा असल्याचे  सचिव श्री. प्रदीप पाटोळे यांनी सांगितले आहे .
Google Form : https://228l0lmk7d6.typeform.com/to/SNIFPrYV
close