सामाजिक कार्यकर्ते अनिल (अण्णा) पवार यांच्या मातोश्री विमल सुदाम पवार यांचे दुःखद निधन.
आज सकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांत्वन भेट देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
इंदापूर प्रतिनिधी:
इंदापूर शहरातील बाबा चौक या ठिकाणी रहिवासी असलेल्या विमल सुदाम पवार यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोलापूर येथील वळसनकर हॉस्पिटल मध्ये दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी उपचार दरम्यान निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास सायं ४ वाजता अनेकांच्या मान्यवर व नातेवाईक यांच्या उपस्थितीत इंदापूर येथील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदापूर येथील कै. सुदाम पांडुरंग पवार यांची पत्नी व सामाजिक कार्यकर्ते अनिल (अण्णा) पवार यांच्या आई कै. विमल सुदाम पवार होत्या.
कै. विमल सुदाम पवार यांना श्री.अनिल (अण्णा) पवार, कु. आकाश पवार, कु. विकास पवार तीन मुले व सोनाली नागनाथ लष्करे जलालपूर आणि मोनाली नागेश देवकर वैराग या मुली आहेत. तसेच एक सून ,नाती, नातवंडे आणि दिवंगत सुदाम पांडुरंग पवार यांच्या निधनानंतरही त्यांचे भाऊ वसंत पवार व विश्वनाथ पवार यांच्या कुटुंबासह त्या एकत्रित राहत होत्या. त्यांच्या निधनाने पवार, लष्करे, देवकर, गुंजाळ परिवार शोकाकुल असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह धनंजय पाटील, शेखर पाटील यांनी पवार परिवाराची भेट घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

