*इंदापूरच्या आश्रमशाळेतील मुलांची पवारांच्या बारामतीत क्षेत्र भेट.*
*इंदापूर प्रतिनिधी (दि.२४) :- येथील दिवंगत रत्नाकर मखरेंच्या संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शरद पवार साहेबांच्या बारामतीत विद्या प्रतिष्ठानातील वस्तू संग्रहालय व नक्षत्र गार्डनला भेट देऊन क्षेत्र भेटीचा आनंद लुटला.
मुलांनी पवार साहेबांना विविध ठिकाणी सत्काररुपी व पुरस्कारातून मिळालेल्या भेट वस्तूंचा संग्रह केलेल्या वास्तूला भेट दिली. संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू स्वतः साहेबांनी हाताळल्या असल्याने त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे.वस्तू पाहण्याचा मोह मुलांना टाळता आला नाही. तेथील वस्तू या वैशिष्ट्यपूर्ण होत्या.
मुलांना तेथील साहेबांचे विविध तैलचित्र,साहेब क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असतानाचे विविध फोटो, संरक्षणमंत्री असतानाच्या मिळालेल्या भेट वस्तू, साहेबांनी वापरलेल्या विविध प्रादेशिक वेशभुषा, अनेक देशांमधील पेन, भारतातील विविध राज्यांतील निरनिराळे फेटे, पगड्या आदिंसह नानाविध भेट वस्तू संग्रहालयात पाहायला मिळाल्या.
तसेच संग्रहालयात असलेल्या "महाराष्ट्र टाइम्स"या वृत्तपत्रामधील "औटघटकेची कवच कुंडले".हा लेख स्वतः पवार साहेबांनी लिहिला आहे.
गेस्ट एडिटर म्हणून स्वतः पवार साहेब आहेत . या गोष्टीचे नवल मुलांना वाटले.
यावेळी निसर्ग क्षेत्रभेटीत नक्षत्र गार्डनला विद्यार्थ्यांनी भेट देत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तेथील विविध औषधी गुणधर्म वनस्पतींची माहिती जाणून घेतली. बगीचामध्ये मोह, कुंचला,आवळा,शमी,फणस, आंबा,अर्जुन,पायरी,बेल,राळ,कडूलिंब व बकुळ आदी दुर्मिळ वनस्पतींचे निरीक्षण करुन त्यांचे गुणधर्म जाणून घेता आले.
यावेळी तेथील दिलीप पडळकर यांनी मुलांना अतिशय स्वादिष्ट मिष्ठान्न दिले.
यावेळी क्षेत्रभेटीत आश्रमशाळेचे शिक्षक राजेंद्र सोनवणे, हिरालाल चंदनशिवे, सोमनाथ माने, संतोष चोरमले, रणजित गोसावी, सविता गोफणे, रेश्मा झेंडे आदी विद्यार्थ्यांसोबत होते.
क्षेत्र भेटी दरम्यान मुलांना चांगली अनुभूती आली.

