*भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाई फुलेंना जयंतीदिनी अभिवादन*
*पेढे वाटून बालिका दिन उत्साहात साजरा*
*इंदापूर प्रतिनिधी*:- (दि.३) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची १९१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प,तर सावित्रीबाई फुले व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना प्र. प्राचार्या सविता गोफणे व प्राध्यापक रेश्मा झेंडे यांनी अनुक्रमे पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी २५ विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच हिरालाल चंदनशिवे, रेश्मा झेंडे, मुख्याध्यापक साहेबराव पवार यांची भाषणे झाली.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु.शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांनी उपस्थितांना सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे व संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात जयंतीदिनी माध्यमिक आश्रमशाळेचे कर्मचारी संतोष शिंदे यांच्या वतीने उपास्थित विद्यार्थ्यांना पेढे वाटून बालिका दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

