shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

सावित्रीबाईंचा हा वसा असाच पुढे सुरू ठेवणे आपल्या पुढील संस्कारी पिढीसाठी खूप उपयुक्त - मुख्याध्यापक रमेश जाधव .

पडस्थळ येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
इंदापूर प्रतिनिधी:आज दि.३ जानेवारी २०२३ रोजी पडस्थळ येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच वैशाली मारकड, उपसरपंच सपना बोंगाणे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कोळेकर, विद्या बोंगाणे, प्रियंका गव्हाणे,बेगम झेंडे, रेश्माताई रेडके या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 यावेळी जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले की सावित्रीबाईंच्या त्यागामुळे, त्यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीमुळे आज आपल्या महिला समाजात सन्मानाने शिक्षण घेत असून नवीन पिढी घडविण्याचे काम करीत आहेत. महिला शिक्षित झाल्याने कुटुंब घडते, परिणामी गावाचा व देशाचा विकास त्यामुळे आपोआप घडून येतो. त्यामुळे आपण सर्वांनी सावित्रीबाईंचा हा वसा असाच पुढे सुरू ठेवणे आपल्या पुढील संस्कारी पिढीसाठी खूप उपयुक्त आहे.
याप्रसंगी माजी सरपंच हरिदास रेडके, पांडुरंग मारकड, सुग्रीव बोंगाणे, बळीराम बोंगाणे, महेंद्र रेडके, सुभाष बोंगाणे, वसुदेव मारकड, विक्रम बोंगाणे,अमोल कोळेकर, ग्रामसेवक महेश यादव, पोलीस पाटील गणेश राऊत, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून सावित्रीबाईंना मानवंदना दिली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक बळीराम  बोंगाणे यांनी केले. आभार सहशिक्षक सुरेश घोळवे यांनी मानले.
close