shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती दिनी सामाजिक उपक्रम.

वडापुरी जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती दिनी सामाजिक उपक्रम.

 मयुरा ठोंबरे-  पाटील व इतर सहकारी मैत्रिणींच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे सावित्रीबाई फुले यांची १९१ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  मयुरा ठोंबरे- पाटील व स्वाती करे यांच्या हस्ते  करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रमातून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी वडापुरी ग्रामपंचायतचे सदस्य आनंद चंदनशिवे, विठ्ठल कदम ,ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे, पोलीस पाटील महेश नलवडे ,शालेय शिक्षण समितीचे रणजीत चंदनशिवे, मुख्याध्यापिका रजिया शेख, मोरे मॅडम ,खाडे मॅडम ,माने सर, अंगणवाडी सेविका कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  मयुरा ठोंबरे-  पाटील, स्वाती करे, आशा जावळे, सायली देशपांडे, अश्विनी शिंदे ,राणी करगळ, स्वप्नाली चित्राव, पल्लवी कोकाटे, राणी जाधव यांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील मुलांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक  चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार मोरे मॅडम यांनी मानले.
close