shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन

वडापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात महिलांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या,आंबिका बागल, माजी सरपंच आसमा मुलानी,सकीना शेख, आसमा शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रताप बागल, आनंद चंदनशिवे,  ग्रामसेवक  नंदराज चंदनशिवे, पोलीस पाटील महेश नलवडे ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नंदराज चंदनशिवे म्हणाले की,सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात बालिका दिन व स्री मुक्ती दिन म्हणून साजरी केली जाते. आज या कार्यालयात महिला उपस्थित आहेत त्याचे संपूर्ण श्रेय  हे सावित्रीबाई फुले यांना जाते.  चूल आणि मूल यामध्ये मर्यादित असणारी स्री ला गुलाम करून ठेवलं होतं. घराच्या बाहेर न पडणे, घरातीलच कामे करत असणारी स्त्री यांच्यासाठी महात्मा फुले यांनी  ठरवले की, स्री प्रथम शिकल्या पाहिजेत. या उद्देशाने त्यांनी पहिली सुरुवात आपल्या घरातून केली आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं . सावित्रीबाईंनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इतरांना शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी आपल्या  वर्ण व्यवस्था, जातीव्यवस्था मुळे त्या काळी महिलांना बाहेर पडता येत नव्हतं. परंतु त्या काळात स्री म्हणून एक शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या . मुलींना महिलांना शिकवायला लागल्या  ते शिकवत असताना त्यांना शेन, दगड, शिव्या  सहन करावे लागले. आणि त्यांनी ते सहन केले. म्हणून आजची स्री भयमुक्त म्हणजेच घराबाहेर पडू लागली. आज सर्व क्षेत्रांमध्ये आपण पाहिले तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. हे कशाचे घोतक आहे तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे स्री घराबाहेर पडली. इथून पुढच्या काळात मध्ये सुद्धा कोणतेही कार्यात स्त्रियांना सन्मानाची आणि आधाराची वागणूक दिली पाहिजे. इथून पुढच्या काळात ग्रामपंचायतीच्या वतीने एक आव्हान करतो की, गावपातळीवर जे कर्मचारी महिला असतील त्या प्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये उपक्रम राबवत असताना आपण चांगल्या प्रकारे राबवूया ज्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त स्त्रियांनी सहभागी होवो अशा प्रकारचे सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो.
close