shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोफत फिरता दवाखाना व कोपीवरची शाळा कर्मयोगीचा आदर्श महाराष्ट्रातील कारखान्यांनी घ्यावा असेच दोन्हीही उपक्रम - पद्माताई भोसले

मोफत फिरता दवाखाना व कोपीवरची शाळा कर्मयोगीचा आदर्श  महाराष्ट्रातील कारखान्यांनी घ्यावा असेच दोन्हीही उपक्रम - पद्माताई भोसले.

पद्माताई भोसले यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील स. सा. कारखाना महात्माफुलेनगर येथील  कोपी वरच्या शाळेला दिली भेट.
इंदापूर प्रतिनिधी: दि. २८ जानेवारी रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुलेनगर येथे  शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कोपी वरची शाळा (अभ्यास वर्ग) आणि शंकराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर फिरता दवाखाना या दोन्हीही उपक्रमाची पाहणी करण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, आणि ट्रस्टचे विश्वस्त श्री अरविंद गारटकर सर यांनी भेट दिली.
यावेळी कर्मयोगीचे माजी व्हॉइस चेअरमन  भागवत  गटकुळ, कर्मयोगी चे कार्यकारी संचालक  देवराव लोकरे , शेतकी अधिकारी  किशोर हिंगमिरे ,  शिंदे ,  माने , शिवाजी तरंगे , नवनाथ व्यवहारे  या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
 पहिल्याप्रथम कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ऊसतोड मजुरांच्या महिला यांच्याकडून श्रीमती पद्माताई भोसले यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ऊसतोड करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले तसेच ७० विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मयोगीचे कार्यकारी संचालक  देवराव लोकरे  यांनी दोन्हीही उपक्रमास कारखान्याची मदत कशी होते. याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी केले, त्या म्हणाल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपी वरची शाळा हा उपक्रम आपण ट्रस्टमार्फत ह्या वर्षी सुरु केला आहे. या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी अजून या शाळेमध्ये प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरा प्रोजेक्ट शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र या प्रोजेक्टला तीन वर्षे झाली आतापर्यंत १६७४२ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ह्यावर्षी कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील 66 गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची तपासणी करण्यात आली. मोफत औषध उपचार करण्यात आले. यावर्षी २५०२ ऊस तोडणी तपासणी झाली. विविध आजारांवर उपचार करण्यात आले. हे दोन्हीही उपक्रम महाराष्ट्रामध्ये  नावा रूपाला  आले, कर्मयोगीचा आदर्श  महाराष्ट्रातील कारखान्यांनी घ्यावा असेच दोन्हीही उपक्रम आहेत. म्हणून आम्ही पुढील वर्षी उपक्रमामध्ये अनेक बदल  करणार आहोत असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ट्रस्टचे विश्वस्त  अरविंद गारटकर यांनी केली. कोपी वरच्या शाळेचे प्रमुख  भारत बोराटे , सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, प्रशिक्षक अनुष्का चव्हाण, अंकिता चव्हाण, प्रदीप कांबळे, अकतर शेख, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय रणजीत साठे,  संजय शेलार, जावेद हबीब अकॅडमी चे प्रमुख  अमोल राऊत, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर यांनी केले व दोन्हीही उपक्रमाची माहिती दिली. 
माने यांनी सूत्रसंचालन केले. तर यावेळी ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवण देण्यात आले.
close