shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - ज्ञानदेव बागल.


*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - ज्ञानदेव बागल.

शिक्षक समिती इंदापूर शाखेची सहविचार सभा इंदापूर येथे संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:दि २८ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती १७ वे राज्य अधिवेशन दि १५ ते १८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला येथे संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  , केंद्रीय मंत्री नारायण राणे , ग्रामविकास मंत्री गिरिषजी महाजन , शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर , पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण , उद्योगमंत्री उदयजी सावंत यांचे उपस्थितीत होणार आहे.
            अधिवेशन जुनी पेन्शन योजना लागू करावी , वरिष्ठ वेतन श्रेणी त्रुटी जीआर काढावा , वस्तीशाळा शिक्षकांची सेवा ग्राह्य करा, एम एस सी आयटी अट मुदतवाढ , मुख्यालयी राहणे अट रद्द करावी. अशा विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत. इंदापूर शाखेची नियोजन सभा ज्ञानदेव बागल यांचे अध्यक्षतेखाली इंदापूर येथे संपन्न झाली. 
यावेळी तालुक्यातील सर्व शाळेवर जाऊन शिक्षकांना जागृती करणे अधिवेशनास उपस्थित राहण्याची विनंती करण्याचे ठरले. जिल्हा नेते सुनिल वाघ यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष नजीर शिकीलकर , कोषाध्यक्ष भारत ननवरे , कार्याध्यक्ष तुकाराम ठोंबरे , सरचिटणीस विनय मखरे यांचेसह तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रवक्ते संतोष हेगडे यांनी मानले.

close