श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथि हुतात्मा दिन म्हणून संपन्न .
सकाळी ११ वाजता दोन मिनिट उभा राहून केली श्रद्धांजली अर्पित.
इंदापूर प्रतिनिधी: हुतात्मा दिन भारतात वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. हुतात्मा दिनाला शहीद दिन असेही म्हणतात. म्हणजेच आपल्या देशासाठी ज्या व्यक्तींनी जीव गमावला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा दिन साजरा केला जातो.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. ३० जानेवारी १९४८ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी महात्मा गांधीजी यांची गोळी घालून हत्या केली होती म्हणून ३० जानेवारी हा दिवस भारतात हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आज श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. महात्मा गांधी यांची पुण्यतिथि हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आली . विद्यालयाचे मुख्याध्यापक भालचंद्र निंबाळकर सर यांनी प्रतिमेचे पुजन केले तसेच बरोबर ११ वाजता दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .

