shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव च्या सन २०००(१० वी) च्या बॅच ची श्रावणबाळ आश्रमास मदत

श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव च्या सन २०००(१० वी) च्या बॅच ची श्रावणबाळ आश्रमास मदत

नववर्षारंभी बालमित्र ग्रुप चा स्तुत्य उपक्रम
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव च्या सन २००० च्या १० वीच्या बॅचमधील(बालमित्र) ग्रुपने स्नेहमेळाव्यात ठरल्याप्रमाणे आज नवीन वर्षाचे औचित्य साधून श्रावणबाळ आश्रमातील मुलांना अन्नदान म्हणून ५००० हजार रु किमतीचा किराणा भरून छोटीशी मदत केली. आश्रमाचे प्रमुख राजीव करडे सरांनी आश्रम व मुलांबद्दल माहिती सांगितली.
भारत रणवरे सर यांनी माहिती विचारले असता सांगितले की,आम्ही त्या ठिकाणी गेलो असता  त्यावेळी सर्व मुले हरिपाठ म्हणत होती. वातावरण प्रसन्न होते.आमच्या बालमित्रांपैकी आज विकास हगारे व गणेश खारतोडे या दोघांचा वाढदिवस ही आश्रमातील मुलांसमवेत साजरा केला.सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.अन्नदान केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.सदर कार्यक्रमास बंडू बनसोडे,विकास हगारे,गणेश खारतोडे,नितीन हगारे,माऊली महाराज,संदीप जाधव, सावळाराम गावडे,दत्तात्रय गावडे,सुभाष गावडे,तानाजी शिंगाडे, आश्रम चालक राजीव करडे व विद्यार्थी उपस्थित होते.जमा झालेल्या पैशांतून अशीच सामाजिक कामे करणार असल्याचे बालमित्र ग्रुपकडून सांगण्यात आले. 

राजीव करडे सरांनी या उपक्रमाचे कौतुक करून  आभार मानले.
close