कर्मयोगीचा फिरता दवाखाना ऊसतोड मजुरांसाठी वरदान - महेंद्र रेडके
शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पडस्थळ येथे ऊसतोड मजुरांची केली आरोग्य तपासणी.
इंदापूर प्रतिनिधी: शंकररावजी] पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर यांच्यावतीने पडस्थळ गावच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी बोलताना महेंद्र रेडके म्हणाले की, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा हा फिरता दवाखाना ऊसतोड मजुरांसाठी वरदान ठरत आहे. ऊसतोड मजुरांना जागेवरती उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याची सोय होत असून आर्थिक बचत होत आहे.कर्मयोगी कारखान्याच्या मा. व्हाईस चेअरमन पद्माताई यांच्या संकल्पनेतून व सहकार्यामुळे हा उपक्रम याही वर्षी सुरु आहे. यामध्ये ऊसतोड मजुरांना मोफत औषध उपचार मिळत असून छोटी ऑपरेशन देखील मोफत होत आहेत. त्यामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होत आहे.
यावेळी पंचायत समिती नियोजन समितीचे सदस्य महेंद्र रेडके, कारखान्याचे अधिकारी अशोक भोंगळे, टोळी मालक बाळासाहेब बोंगाणे, चीटबॉय भारत गडदे,राजेंद्र बोंगाणे, कारखान्याचे सभासद बाळासाहेब बोंगाणे नरसिंह महाडिक,रामेश्वर पवार, ग्रामस्थ गणेश गव्हाणे, कैलास बोंगाणे ,पप्पू खरवडे, आरोग्य प्रमुख महादेव चव्हाण, संजय शेलार, डॉक्टर कुंभार मॅडम, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय अख्तर शेख ,कर्मयोगी कारखान्याचे मुख्य शेतकरी अधिकारी किशोर हिंगमिरे, नवनाथ व्यवहारे, विष्णू कोळेकर
आधी उपस्थित होते.

