नवीन वर्ष नवीन संकल्प लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी आली सी.सी.टी.व्ही. कक्षेत.
सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांची होत आहे कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) वडापुरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नवीन वर्ष नवा संकल्प यानुसार गावातील लोक सहभागातून शाळा सीसीटीव्ही कॅमेरा कक्षेमध्ये दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी आणली गेली. यातून या शाळेत शिकणारी मुले व शाळेले पूर्णतः सुरक्षा एक प्रकारची प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. लोकसहभागातून केलेल्या कार्याची व यास सहकार्य करणाऱ्यांची शाळेतील शिक्षक पालक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत असताना दिसून येत आहे.

