प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
महाराष्ट्र अंनिस व सोबत काम करणाऱ्या विवेकी संघटना भोंदूगिरी व पाखंडी लोकांना कोणतेही आवाहन देताना जगातील सर्व शक्य-अशक्य बाबींचा पुरेपूर विचार करून आव्हान देतात.अंनिस व विचारी मित्रसंघटनांनी दिलेले आवाहन सहजासहजी स्वीकारून आपला दावा सिद्ध करणे आजपर्यंत जगात कोणत्याच भोंदू व पाखंडी व्यक्तीला जमलेले नाही.
मीडिया व सोसेल मीडियातुन वेगाने चर्चेत आलेला बागेश्वर धाम सरकार नामक स्वयंघोषित महाराजाला आम्ही लवकरच खोटे असल्याचे सिद्ध करू असा विश्वास महाराष्ट्र अंनिस च्या बीड जिल्हा शाखेने केलेला असून तोपर्यंत बीड जिल्ह्यातील जनतेने महाराज व त्याच्या समर्थकांनी केलेल्या दाव्यावर अजिबात विश्वास ठेवू नये असे आवाहनही जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या नागपूर व रायपूर येथे अध्यात्माचा आडून चमत्काराचा दावा करणारा बागेश्वर सरकार नामक महाराज आपल्याला देवी देवतांचा साक्षात्कार होत असल्याचा दावा करत असून आपण भक्तांचे नांव, वडिलांचे नांव व त्याच्या समस्या साक्षात्काराने ओळखतो असा दावा करत आहे. ज्यांची नांवे व समस्या महाराज ओळखतो ते लोक महाराजाच्या व्यवस्थेने पूर्वनियोजित काय बोलायचे व कसे वागायचे हे ठरविलेले लोक असतात. मात्र अद्याप महाराजाने महाराष्ट्र अंनिस समोर आणेल त्या दहा लोकांच्या बाबत अशी माहिती देण्याचे आवाहन स्वीकारलेले नाही व स्वीकारूही शकत नाही असा अंनिस ला विश्वास आहे. आम्ही दिलेल्या व्यक्तीची या महाराजाने अचूक।माहिती स्वीकारल्यास समितीने संबंधित महाराजाला अनुक्रमे 21 लाख व 31 लाखांचे बक्षीस देशपातळीवर जाहीर केलेले आहे.
या महाराजाच्या हात-चालाकी व सादरीकरणाचा महाराष्ट्र अंनिस संपूर्ण अभ्यास करत असून लवकरच महाराष्ट्र अंनिस हा महाराज ज्या चमत्कार व साक्षात्काराचे दावे करत आहे ते सर्व ते सर्व दावे जाहीर कार्यक्रमातून देशापुढे सादर करेल असा विश्वासही बीड जिल्हा शाखेने व्यक्त केला आहे.
चमत्काराचा दावा करणारे असे लोक कांही काळ आपल्या चमत्काराचा दावा करतात मात्र तितक्याच वेगाने त्यांचे दावे कालबाह्य होतात हे देशाने व जगाने वेळोवेळी अनुभवलेले आहे. तसा महाराज खूप लवकर लोकांच्या चर्चेतुन दूर जाईल. सध्या ज्या लोकांची रोजीरोटी व दुकाने अशा भोंदूगिरी व अंधश्रद्धेच्या साम्राज्यावर टिकून आहे असे लोक संधी व परिस्थिती पाहून या महाराजाला मोठ्या प्रमाणात समर्थन देण्यासाठी पुढे येत आहेत.
आपल्या भक्तांच्या श्रद्धेचा कमजोरीचा फायदा घेत व गर्दीच्या सामर्थ्यावर हा महाराज संपूर्ण जगाची दिशाभूल करत असून लवकरच विवेकी संघटना पुराव्यानिशी या महाराजांचे सर्व बिंग फोडून सत्य बाहेर आणतील असा विश्वासही महाराष्ट्र अंनिस बीड जिल्हा संघटनेच्या वतीने हनुमंत भोसले यांनी व्यक्त केला आहे.

