इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाने गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा केला सत्कार
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने (दि.२१ जाने) रोजी उपक्रमशील हिंदी विषय शिक्षक तसेच हिंदी निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी, व हिंदी विषयांमध्ये अखंड सेवा करून निवृत्त झालेले शिक्षण यांचा सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विभाग पुणे माजीआमदार दत्तात्रय सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.छाया पाटील , डॉ. गणेश करे पाटील , उस्मान मुलाणी , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश घोरपडे ,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांनाच बोलता आली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नवादी असावे. हिंदी भाषा ही घराघरातून बोलली जावी असे मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदापुर हिंदी अध्यापक संघ अध्यक्ष शब्बीर मुलाणी तसेच सुधाकर भोंग, संजीव पांढरे , राजेंद्र रणमोडे, मचाले , निंबाळकर , तसेच सर्व हिंदी अध्यापक यांनी प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. डी. भोंग यांनी केले व आभार प्रदर्शन चंद्रकांत सोळसे यांनी केले.

